अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याचा मुद्दा संपूर्ण राज्यभरात गाजला.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी यासंदर्भात नव्याने स्पष्टीकरण दिले आहे.
लोकशाहीचा मान राखत पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अर्ज दाखल करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला होता. या प्रक्रियेची सर्व माहिती, सुविधा प्रशासनाकडून त्यांना पुरवण्यात आली होती. जगात असे कोणतेही केमिकल अस्तित्वात नाही ज्याने लिहिलेले पुसून टाकता येईल. सहीच्या ठिकाणी कोणतीही खाडाखोड नाही. ऑफलाइन अर्जावर छेडछाड झाली असती तर संबंधितांनी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्यांनी ऑनलाईन अर्ज तपासावा. त्यावरही सही नाही. पुरावा जिवंत आहे. हा मुद्दा अतिशय संवेदनशील बनल्याने अर्ज बाद करण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा केली. त्यांचा सल्ला घेतल्यानंतरच अर्ज बाद केला गेला असे स्पष्टीकरण सचिन मुळीक यांनी दिले आहे.

