• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

Yes News Marathi by Yes News Marathi
October 4, 2026
in Blog
0
लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा
0
SHARES
0
VIEWS

आमदार सचिन कल्याणशेट्टी; नवलेखक – नवकवींसाठी आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन

सोलापूर. इतिहास असो वा कविता, कोणताही साहित्यप्रकार हाताळताना लेखकाला वास्तवाचे भान असणे आवश्यक आहे. पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्यांच्या आधारावर लेखन करावे, असे प्रतिपादन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवलेखक व नवकवींसाठी रविवारी (ता. ४) आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बाराव्या शतकात श्री शिवयोगी सिद्धरामांनी वचन साहित्याच्या माध्यमातून समरसतेचा विचार मांडला. सोलापूर शहर हे देशात समरसतेचे उत्तम उदाहरण आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतर साहित्याच्या माध्यमातून इतिहासाची मोडतोड, महापुरुषांची बदनामी आणि गौरवशाली परंपरेचे विद्रुपीकरण करण्याचे प्रयत्न झाले. अशा पार्श्वभूमीवर नवलेखक व नवकवींनी तथ्यात्मक आणि वास्तववादी लेखनातून साहित्य क्षेत्रातील गौरवशाली परंपरा जपावी, असे आवाहन त्यांनी केले.

साहित्यिकांचे कळप तयार झाल्याची खंत व्यक्त करत प्रमुख पाहुणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे म्हणाले, साहित्याने जगण्याची आणि मरण्याची धिटाई द्यायला हवी. नव्या पिढीला सत्त्व आणि स्वत्त्वाची जाणीव करून द्यायला हवी. समरसता साहित्य परिषदेने माणूस म्हणून जगण्याची भूमिका मांडत आपले वेगळे अस्तित्व जपले आहे.

प्रास्ताविकात डॉ. गजानन होडे यांनी समरसता साहित्य परिषदेच्या स्थापनेपासूनच्या कार्याचा आढावा घेत साहित्य क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला. यावेळी परिषदेचे कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील, सहकार्यवाह सुहास घुले, सोलापूर शाखाध्यक्ष प्रा. माधव कुलकर्णी, सुनील ढेंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रद्धा रोडगे व सुप्रिया लिमये यांनी गीत गायिले. दुर्गा जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर ऐश्वर्या धडके यांनी आभार मानले.

यावेळी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे उपाध्यक्ष जगन्नाथ हुक्केरी, जनता बँकेच्या संचालिका गौरी आमडेकर, आनंद धडके, दुर्गा जोशी, मदन जवळेकर, अमृता कल्याणी, रुपा कुताटे, विजयकुमार सोनवणे आदी उपस्थित होते.

‘जेन झी’ला कालिदासाचेही आकर्षण असू द्या!

‘जेन झी’च्या मोबाईल आणि रील्सच्या विश्वात अडकलेल्या काळात समरसता साहित्य परिषदेने नवलेखक व नवकवींसाठी आयोजित केलेला उपक्रम स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार आमदार कल्याणशेट्टी यांनी काढले. ‘जेन झी’ला पाश्चात्त्य लेखक आणि त्यांच्या साहित्याचे आकर्षण असेल; मात्र, त्यांनी कालिदासाला विसरू नये. कारण जगाला मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य भारतीय साहित्य आणि ज्ञानसंपदेत आहे. भारतातील ज्ञानसंपदा व पारंपरिक शिक्षणपद्धती आक्रमकांनी आणि वसाहतवाद्यांनी नष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous Post

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

Related Posts

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार
Blog

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी
Blog

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी
Blog

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Blog

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 2, 2026
दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?
Blog

दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

September 29, 2026
सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर
Blog

सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर

September 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

लेखकाला वास्तवाचे भान हवे; पूर्वग्रह बाजूला ठेवून तथ्याधारित लेखन करा

October 4, 2026
विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

विकायला काढलेल्या गावात आज पालकमंत्री जाणार…! साहेब, उजनी कडे लक्ष द्या…

October 4, 2026
शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026