• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्य उत्पादन शुल्क विभागाने गाठले महसुलाचे उद्दिष्ट वर्षभरात 2067 गुन्ह्यात सहा कोटींचा मुद्देमाल जप्त

Yes News Marathi by Yes News Marathi
April 5, 2024
in इतर घडामोडी
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाने गाठले महसुलाचे उद्दिष्ट वर्षभरात 2067 गुन्ह्यात सहा कोटींचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
1
VIEWS

राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता शासनाने दिलेले महसुलाचे उद्दिष्ट पूर्ण केले असून वर्षभरात अवैध दारूविरुद्ध राबविलेल्या मोहिमेत सहा कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसुलाच्या संवर्धनाकरिता अवैध देशी-विदेशी दारू, हातभट्टी दारू, ताडी इत्यादी विरुद्ध सातत्याने कारवाई केली जात असून सोलापूर जिल्ह्याला आर्थिक वर्ष 2023-24 करिता शासनाकडून 166 कोटी 32 लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते, 31 मार्च अखेर विभागाकडून 189 कोटी 60 लाखांचा महसूल शासनजमा झाला असून 114% उद्दिष्ट पूर्तता केली आहे. वर्षभरात अवैध दारूविरुद्ध विभागातील अधिकारी व कर्मचा-यांनी केलेल्या सातत्यपूर्ण कारवायांमुळे महसुलाचे उद्दिष्ट गाठणे शक्य झाल्याचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगितले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकूण 2067 गुन्हे दाखल केले असून 1702 आरोपींना अटक केली आहे.

या कालावधीत विभागाने 66,822 लिटर हातभट्टी दारू, 2971 लिटर देशी दारू, 1043 लिटर विदेशी दारू, 2970 लिटर परराज्यातील दारू, 533 लिटर बियर, 12456 लिटर ताडी व 12 लाख 7 हजार 749 लिटर गुळमिश्रित रसायन व 215 वाहने असा एकूण सहा कोटी सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात गुन्ह्यांच्या नोंदीत व मुद्देमालात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी राज्यभरात हातभट्टीमुक्त गाव अभियान ही संकल्पना राबविली असून त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून या आर्थिक वर्षात हातभट्टी निर्मितीचे 668, हातभट्टी दारु विक्रीचे 418 व हातभट्टी दारू वाहतुकीचे 134 गुन्हे नोंदविले आहेत.

हातभट्टीमुक्त गाव अभियान प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरातील तालुकानिहाय व पोलीस स्टेशन निहाय हातभट्टी दारु ठिकाणांची मॅपिंग करण्यात आली त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आठवड्यातून दोन ते तीन वेळा अचानकपणे अशा हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या. तसेच गावातील सरपंच , पोलीस पाटील, ग्रामसेवक यांनाही त्यांच्या गावात हातभट्टी दारू धंदे सुरू असतल्यास त्याची माहिती विभागाला देण्याचे आव्हान करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 16 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत एकूण 114 गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यात 33 लाख एकसष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाने बार्शी तालुक्यातील भातंबरे तांडा या ठिकाणी टाकलेल्या हातभट्टी धाडीत विभागाने एकूण एकोणविस हजार दोनशे लिटर रसायन व पाचशे लिटर हातभट्टी दारू व इतर साहित्य असा एकूण आठ लाख दोन हजार आठशे किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एकूण चार गुन्हे नोंदविण्यात आले असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात सहा पथके नेमण्यात आली असून प्रत्येक पथकात निरीक्षक, दोन दुय्यम निरीक्षक , एक सहाय्यक दुय्यम निरीक्षक, तीन जवान व एक वाहनचालक असा स्टाफ समाविष्ट असून याव्यतिरिक्त एक भरारी पथक व एक शीघ्रकृतिदल असे विशेष पथक नेमण्यात आले आहे.

याशिवाय कर्नाटक राज्याच्या सीमेवर अक्कलकोट तालुक्यात वागदरी व मंगळवेढा तालुक्यात मरवडे या ठिकाणी दोन तात्पुरते सीमा तपासणी स्थापन करण्यात आले असून संशयित वाहनांची नियमितपणे तपासणी करण्यात येत असून अवैध दारूची वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. याव्यतिरिक्त दारु दुकानातून होणा-या दररोजच्या दारु विक्रीवरही विभागाचे कडक लक्ष असून दारु दुकानांची अचानकपणे तपासणी केली जात असल्याचेही अधीक्षक नितिन धार्मिक यांनी सांगितले…

Tags: The State Excise Department
Previous Post

बाईकवर त्रिपलसीट जाताना अपघात; बार्शी तालुक्यात दोन ठार

Next Post

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026