सोलापूर शहरातील दमानी नगर येथे असलेला 103 वर्ष जुना रेल्वेचा ब्रिज 14 डिसेंबर रोजी पाडण्यावर रेल्वे कडून शिक्कामोर्तब झाला आहे. याबाबत रेल्वे कडून बुधवारी जाहीर प्रसिद्धीकरण देखील करण्यात आले. 14 डिसेंबर ते 19 डिसेंबर या दरम्यान विविध. वेळेत मेगाब्लॉक घेऊन रेल्वेचा जुना ब्रिज पाडला जाणार आहे 14 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेसात म्हणजेच तब्बल 11 तासाचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 डिसेंबर रोजी सकाळी सव्वा 11 ते दुपारी पावणे दोन असा अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. 16 आणि 17 डिसेंबर रोजी साडेतीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 18 आणि 19 डिसेंबर रोजी साडेतीन तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. या मेगा ब्लॉकच्या कालावधीमध्ये दमाणी नगरच्या रेल्वे ओव्हर ब्रीजच्या सुपर स्ट्रक्चर आणि सब स्ट्रक्चर पाडण्यात येणार आहे. 14 डिसेंबर रोजी सोलापूर पुणे, सोलापूर होस्पेट, सोलापूर वाडी, सोलापूर दौंड, सोलापूर कलबुर्गी, या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 14 ते 19 डिसेंबर दरम्यान सोलापूर रेल्वे स्थानकातून ये-जा करणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक यामुळे बदलले आहे. काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हे पाडकाम करण्यात येणार असून पुढील वर्षभरात या ठिकाणी नवीन रेल्वे ब्रिज केला जाणार असल्याचे एन एच आय कडून सांगण्यात आले.

