सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदार संघासाठीच्या प्रारूप मतदार याद्या दिनांक ०३ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या असून, सदर याद्या जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघ निहाय सहा. मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय व उप जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय येथे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.तसेच सदरच्या याद्या जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या संकेतस्थळावर देखील पाहण्यासाठी उपलब्ध आहेत अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर किरण सुरवसे यांनी दिली.

