सरकार कामगारांना गुलाम बनवणारे नवे कायदे आणत आहे. सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करून भांडवलदारांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका करत ज्येष्ठ कामगार नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी सरकार विरुद्ध लढा पुकारला.
विडी कामगारांना दररोज किमान वेतन 402 रुपये, दहा हजार रुपये पेन्शन, रोख मजुरी तसेच गोदुताई परुळेकर वसाहतीत मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी 14 एप्रिल 2026 रोजी दहा हजार महिला कामगारांचा सोलापूर ते मुंबई येथील मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा आडम मास्तर यांनी केली.
दत्तनगर येथील लालबावटा कार्यालयात सिटूच्या 17 व्या सोलापूर जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटन सिटूचे राज्य नेते व जिल्हा प्रभारी वसंत पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आडम मास्तर बोलत होते.
यावेळी आडम मास्तरांनी शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचा खरपूस समाचार घेतला.

