• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे: पालकमंत्री गोरे

Yes News Marathi by Yes News Marathi
July 19, 2025
in इतर घडामोडी
0
शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे: पालकमंत्री गोरे
0
SHARES
1
VIEWS


सोलापूर विद्यापीठातील उद्यमशाळा-शिक्षक प्रशिक्षणाचा समारोप

सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमता शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे. विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना त्यादृष्टिकोनातून घडवावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व सहचर्य विभागातर्फे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांकरिता आयोजित ‘उद्यमशाळा’ या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप पालकमंत्री श्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे होते. याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, उद्योजिका चंद्रिका चौहान, सेवावर्धिनीचे गिरीश देगावकर, शिवरत्न पवार, विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. विकास पाटील, कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख, सिनेट सदस्य रोहिणी तडवळकर, शशिकांत चव्हाण, इनक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुराणी, विनायक बंकापूर, चन्नवीर बंकुर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेसाठी प्रिसिजन फाउंडेशन, सर फाउंडेशन, सेवावर्धिनी, स्वदेशी जागरण मंच, साविष्कार या संस्था सहआयोजक आहेत. एकूण दोन हजार शिक्षकांचा यामध्ये सहभाग होता.

पालकमंत्री श्री गोरे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कौशल्य विकास व उद्योजकतेबाबत शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवला, याचे खरच कौतुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच कौशल्य विकास आणि उद्योजकतेबाबत आग्रही आहेत. यासाठी विविध योजना आहेत. त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून शिक्षकांनी शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर कौशल्य विकास व उद्योजकतेबाबत संस्कार करण्याबरोबरच त्याबाबत मानसिकता तयार करावी, असे आवाहन देखील पालकमंत्री श्री गोरे यांनी यावेळी केले.

कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, आज जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवल्याचे आपण पाहतो. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षक हे फार महत्वाचे असतात. समस्या व अडचणी निर्माण झाल्यास नेहमीच त्यावर उपाय निघतो आणि तेथूनच खऱ्या अर्थाने संशोधनास चालना मिळते. आणि हे काम आज ग्रामीण भागात होत असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आणि बुद्ध्यांक नेहमी अधिक असतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, असे आवाहन देखील कुलगुरू प्रा. महानवर यांनी यावेळी केले. प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या शिक्षकांनी आवर्जून विद्यापीठ भेटीसाठी विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करावे आणि येथील सोयी सुविधांचा विद्यार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले.

Previous Post

२३ वर्षाखालील मुलांचे राज्य संघ निवड चाचणी क्रिकेट सामने

Next Post

पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत नागरिकांशी चर्चा करण्यासाठी 3 उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती..

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत नागरिकांशी चर्चा करण्यासाठी 3 उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती..

पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत नागरिकांशी चर्चा करण्यासाठी 3 उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती..

ताज्या बातम्या

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026
चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026