भारताच्या चांद्र विजयावर मूकबधिर विद्यार्थ्यांचे गोड स्नेहरक्षाबंधन

0
28

सोलापूर – भारतीय शास्त्रज्ञांनी शर्थीचे प्रयत्न करून मिळविलेल्या चांद्र विजयाबद्दल रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्या रक्षाबंधनानिमित्त सन्मानपूर्वक पाठविण्यात आल्या.

इसरो शास्त्रज्ञांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपला तिरंगा फडकवणारा जगातील एकमेव देश होण्याचा मान मिळवला.या ऐतिहासिक क्षणाचा आनंद सर्व मूकबधिर विद्यार्थ्यांनी घेतला. प्रतिवर्षी सीमेवरील सैनिकांसाठी राख्या पाठविल्या जातात.

या वर्षी या भारतीय शास्त्रज्ञसैनिकांची छान भर पडली.हा विजयी क्षण विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी केले.या राख्या बनवण्यासाठी कलाशिक्षक चिदानंद बेनुरे, मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे, तसेच विद्यार्थी ,कर्मचारिवृंद यांचे सहकार्य लाभले.शाळेचे सचिव सुनील दावडा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला.