सोलापूर विभागातील माढा, केम आणि जेऊर स्थानकावर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर थांबा आणि मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व्दारा गाड्यांचे स्वागत

0
17

कोरोना काळात अनेक लहान स्थानकावरील थांबे बंद करण्यात आले होते. पण कोरोनानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली तेव्हा थांबेही पूर्ववत करण्यात आले. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गाडी क्र. 16382 कन्याकुमारी-पुणे एक्सप्रेस ला केम स्थानकावर, गाडी क्र. 11020 भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेस ला जेऊर स्थानकावर आणि गाडी क्र. 12116 सोलापूर-मुंबई सिध्देश्वर एक्सप्रेसला माढा स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी रेल्वे मंत्री यांच्या कडे केली होती.

त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत थांबा मंजूर करण्यात आल्याने गाडी क्र. 16382 कन्याकुमारी-पुणे एक्सप्रेसचे केम स्थानकावर, गाडी क्र. 11020 भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेसचे जेऊर स्थानकावर आणि गाडी क्र. 12116 सोलापूर-मुंबई सिध्देश्वर एक्सप्रेसचे माढा स्थानकावर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूर विभागाचे अधिकारी आणि प्रवाशांच्या उपस्थितीत गाडीचे स्वागत करण्यात आले.

सदर वरील सर्व गाड्यांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वार थांबा देण्यात आला. यावेळी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्र सिंह परिहार, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रणयेवले आदी मान्यवर तसेच रेल्वे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.