सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेने स्वच्छ सुंदर शाळा या अभियानात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे सादरीकरण राज्य स्तरावरील कार्यशाळेमध्ये करणेत आले आहे. युनिसेफ ने उपक्रमा बद्दल जिल्हा परिषदेचे कौतुक केले आहे. युनिसेफ व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने दोन दिवसीय संवाद व क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते.