• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सुशील गायकवाड यांचे शनिवारी सोलापुरात इंग्रजीतून व्याख्यान

Yes News Marathi by Yes News Marathi
July 16, 2025
in इतर घडामोडी
0
सुशील गायकवाड यांचे शनिवारी सोलापुरात इंग्रजीतून व्याख्यान
0
SHARES
1
VIEWS

रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या तर्फे दरवर्षी माजी कुलगुरु व रोटरीचे प्रांतपाल कै. के. भोगिशयन यांच्या स्मरणार्थ व्याख्यान आयोजित केले जाते. यावर्षी श्री. सुशील गायकवाड, कार्यकारी संचालक (Executive Director), संरक्षण मंत्रालय, Government of India हे प्रमुख अतिथी म्हणून येत असून ते “Self Reliance and Transformation of Defence Sector” या विषयावर इंग्रजीतून व्याख्यान देतील.

हे व्याख्यान शनिवार दि. १९ जुलै रोजी सायंकाळी ५:३० वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर मंदिराजवळ, सोलापूर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष रोटे. धनश्री केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे व्याख्यान सर्वांसाठी खुले असून सोलापूरकरांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. विशेषतः महाविद्यालयीन युवक-युवती तसेच व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी हे उपयुक्त असून त्यांनी याचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.

सुशील गायकवाड यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण सोलापुरात घेतले असून, ते भारतीय रेल्वेच्या विविध उच्च पदावर कार्यरत होते. सोलापुरात ते भारतीय मध्य रेल्वेचे वाणिज व्यवस्थापक प्रमुख म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयात संचालक म्हणून कार्य केले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या अन्न व कृषी परिषदेच्या आंतरराष्ट्रीय गटावर काम केलेले आहे. त्यांना कला व साहित्यामध्ये रुची असून त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. तसेच कामानिमित्त देश-विदेशात भरपूर प्रवास, ट्रेकिंग व छायाचित्रकारितेचा छंद त्यांनी जोपासला आहे.

प्रोफेसर के. भोगिशयन हे सोलापूरातील संगमेश्वर महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक होते. १९६० मध्ये ते या महाविद्यालयाचे प्राचार्य झाले आणि १९८३ पर्यंत म्हणजे सलग २३ वर्षे त्यांनी प्राचार्यपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. शिक्षणक्षेत्रात एक कुशल प्रशासक आणि व्यासंगी प्राध्यापक म्हणून आपला ठसा उमटवला. शिक्षणाबरोबरच शिस्त, चारित्र्य, आणि मूल्यांवरची श्रद्धा या गुणांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये व्हावा यासाठी ते अविरत प्रयत्नशील राहिले. रेडक्रॉसच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, रोटरी क्लबचे प्रांतपाल, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष, कोल्हापूरच्या सायबर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष, सोलापूरातील श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य पाहिले. अशा विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

रोटरी क्लब ऑफ सोलापूर तर्फे के. भोगिशयन यांच्या स्मरणार्थ गेल्या 20 वर्षांपासून विविध विषयांवर तज्ञ व्यक्तींची इंग्रजी मध्ये व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत. त्यामध्ये आजपर्यंत टाईम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक – स्व. दिलीप पाडगांवकर, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु – डॉ. नरेंद्र जाधव, शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, डॉ. पंडित विद्यासागर, श्री. प्रकाश बंग, महाभोक्ता अ‍ॅड. श्री. आशुतोष कुंभकोणी, न्यायमुर्ती अजित शाह, डॉ. एन. एम. कोंडप, रोटरीचे आंतरराष्ट्रीय माजी अध्यक्ष राजा साबू, कल्याण बॅनर्जी, सौ. रेखा शेट्टी, श्री. यतीन शहा, माजी सरन्यायाधीश श्री. उदय लळीत, गोविंद देव गिरीजी आदि नामवंत वक्त्यांचे विचार ऐकण्याचा लाभ सोलापूरकरांना मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे सचिव निलेश फोफलिया, सलाम शेख, संदीप जव्हेरी, मितेश पंचमिया, संतोष कणेकर, पराग कुलकर्णी, प्रशांत सिंगी, सागर गोगरी आदी उपस्थित होते.

Previous Post

दैनिक केसरीचे संपादक डॉ. दीपक टिळक यांचे निधन

Next Post

मंगळवेढात होणाऱ्या महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा बदलणार – जागेचा प्रस्ताव पाठवण्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आदेश

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
मंगळवेढात होणाऱ्या महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा बदलणार – जागेचा प्रस्ताव पाठवण्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आदेश

मंगळवेढात होणाऱ्या महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा बदलणार - जागेचा प्रस्ताव पाठवण्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आदेश

ताज्या बातम्या

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026
चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026