महाराष्ट्रातील सर्व मंदिरावरील स्पीकर वरून प्रबोधनासाठी परवानगी द्या – सुधाकर इंगळे महाराज

0
961

येस न्युज मराठी नेटवर्क : सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महामारी कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये मृत्यूचे प्रमाण ही वाढत असल्यामुळे त्यासर्व रुग्णांना मानसिक आधाराची खूप गरज आहे. अनेक जण घाबरून मरण पावत आहेत असे वाटते.मृत्यू संख्या वाढत आहे. मानसिक आधार हा खूप महत्वाचा असतो. त्या साठी राज्यातील गावागावात प्रत्येक मंदिरावर स्पीकर लावून त्या वरून भजन, कीर्तन, भक्तीगीत, मंत्र, आरती, श्लोक, भारूड, इ. लावून घराघरात हा आवाज -ध्वनी कॅसेटद्वारे पोहोचवून प्रबोधन करून मानसिक स्थिरता, आधार देता येईल.त्याचा खूप चांगला फायदा रुग्णाना व इतर नागरिकांना होईल.याचा गांभीर्याने विचार करून रुग्ण वाचविण्यसाठी उपयोग होईल. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर रुग्णांना मानसिक आधारासाठी प्रवचन, कीर्तन स्पीकरवर प्रसारित करण्यास परवानगी लवकरात लवकर जाहीर करून सहकार्य करावे असे निवेदन ईमेल द्वारे मा. मुख्यमंत्री यांना अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांनी पाठवले आहे.