करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची संपत्ती केली जगजाहीर

0
112986

येस न्युज मराठी नेटवर्क : बीडचे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. कारण, आताही त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी चक्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धनंजय मुंडे यांच्या संपत्तीबद्दल सगळी माहिती दिली आहे. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबूकवर एक व्हिडिओ शेअर करत धनंजय मुंडे यांच्या सगळ्या संपत्तीबद्दल माहिती दिली असून मुंबईत आमदारांसाठी बांधली जाणारी इमारत बांधू नका, त्यासाठी ऐवढा कोट्यावधी पैसा खर्च करण्याची गरज नाही अशी विनंती करुणा मुंडे यांनी केली आहे. त्यांच्या या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

https://fb.watch/5ApO5bJDPd/

खरंतर, या व्हिडिओमुळे धनंजय मुंडे यांना आणखी काय अडचणींचा सामना करावा लागणार? विरोधक यावर काय प्रतिक्रिया देणार? इतकंच नाहीतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काही उत्तर देणार का? असे अनेक प्रश्न यानिमित्त समोर येतात.