सोलापूर – दिनांक 6 मार्च 2025 रोजी सोलापूर शहर व जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन व सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघातर्फे निवासी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी अध्यायावत अशा मंजूर झालेल्या सिंथेटिकच्या ट्रॅक च्या योग्य निधी खर्च संदर्भात व सिंथेटिक ट्रॅक हा तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने बांधण्या संदर्भात निवेदन देण्यात आले .
सदर सिंथेटिक ट्रॅक हा पश्चिम दिशेस 110 मीटर हर्डल्स व १०० मीटर धावणे दहा लेन चा व दोन्ही डी सिंथेटिक कराव्यात अशा संदर्भात चे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनामध्ये आठ लेन चा अध्यायावत सिंथेटिक ट्रॅक असून आतील बाजू देखील सिंथेटिक करायचे असून विविध खेळांसाठी फेकीच्या बाबी, उड्यांच्या बाबी यासंदर्भात योग्य त्या रचना करून टेक्निकल बाजूने विचार करून बांधण्यात याव्या व त्याचा निधि त्यासाठी मंजूर झालेला संपूर्ण निधी हा सिंथेटिक ट्रॅक कामी वापरावा व सोलापूर शहर व जिल्ह्यातील त्याचे योग्य असे व्यवस्थापन व्हावे .
या निवेदनाद्वारे सोलापूर शहर व जिल्ह्यातील नवख्या खेळाडूंना मैदानी स्पर्धेत राज्य, राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जा उंचावण्यास मदत होईल जेणेकरून सोलापूर शहर व जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात मैदानी प्रकारात गाजावे या पाठीमागची भूमिका सोलापूर शहर व जिल्ह्यातील असोसिएशनचे सचिव राजू प्याटी सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, शहर अध्यक्ष विठ्ठल कुंभार,सोलापूर शहर शारीरिक शिक्षण महासंघाचे सचिव प्रमोद चुंगे ,सहसचिव प्रा.राहुल हजारे, महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा प्रा.सुवर्ण कांबळे, आरती मलजी, क्रीडा शिक्षक संतोष जाधव ,अथलेटिक कोच रवी राठोड आदी मान्यवर निवेदन देण्यास उपस्थित होते.











