श्रीमंतयोगीने अनोख्या पद्धतीने केले रक्षाबंधन साजरे

0
19

ड्रायव्हरदादांना राखी बांधून सुरक्षित वाहतूकीसाठी केले प्रबोधन

सोलापूर : रक्षाबंधन म्हणजे बहिणीने भावाला आपलं संरक्षण करावं, संकटात धैर्यानं पाठीशी उभं रहावं,या करता बांधलेली राखी व केलेलं औक्षण…..
नेमकं ह्याच भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवत श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने शहरातील चौत्रा पूना नाका ह्या ठिकाणी ड्रायव्हरदादांना राखी बांधून सुरक्षित वाहतूक बाबतीत प्रबोधन केले.श्रीमंतयोगीने अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला.

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांच्या संकल्पनेतून हा अनोखा रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला.याप्रसंगी पुणे हैद्राबाद ह्या राष्ट्रीय महामार्गांवरील ट्रक तसेच मोटारचालक दादांना श्रीमंतयोगी च्या महिला सदस्यांनी सुरक्षित व सुखरूप वाहन चालवा व संपूर्ण परिवाराला सुखद प्रवास घडावा, ह्यासाठी अपघात सुरक्षा राखी बांधल्या. याप्रसंगी वाहतूक शाखेचे अधिकारी व वाहनचालक दादांनी ह्या उपक्रमाचं कौतुक केलं.

या प्रसंगी ज्योती कासट, रंजना ढेंगळे, अक्षता कासट, अँड.ज्योती गायकवाड, माधुरी चव्हाण, शुभांगी लचके, प्रियंका जाधव ह्या सखी सदस्यांनी वाहनचालक दादांना वाहतूक सुरक्षा संदेशाची राखी बांधली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कासट, महेश ढेंगळे, दिनेश मंत्री, संतोष अलकुंटे,अभिजित व्होनकळस, शामकुमार मुळे, प्रकाश आळंगे, राजेश केकडे, बसवराज पंचडे, रविशंकर जावळे आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

राखीच्या माध्यमातून दिला हा संदेश !

यावेळी वेगमर्यादा पाळा, सीटबेल्टचा वापर करा, हेल्मेटचा वापर करा, मोबाईलचा वापर टाळा, वाहन चालविताना योग्य इशाऱ्यांचा वापर करा, वाहनांची वेळोवेळी सर्व्हिसींग करणे, गती पर रखें नियंत्रण, सिर्फ जरुरी होने पर बजाए हॉर्न, ओव्हरटेक से बनाइए दुरी हा संदेश देण्यात आला.