सोलापूर शहरातील रस्ते दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे दिवसा अरुंद दिसतात तर रात्रीच्या वेळी ते रस्ते मोठे दिसतात. अतिक्रमणाची कारवाई मोठ्या प्रमाणावर करणे गरजेचे असताना आता ही मोहीम थंडावली आहे. त्यामुळे शहरातील विविध रस्त्यावर तसेच चौकाचौकात ट्रॅफिक जाम झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. सात रस्ता ते रंगभवन या रस्त्यावर देखील वाहतुकीची वर्दळ प्रचंड वाढली आहे. जिल्हा परिषद,एसपी ऑफिस, कोर्ट, सिव्हिल, या परिसरात असल्यामुळे या रस्त्यावर प्रचंड वाहतुकीचा लोड असतो. वास्तविक पाहता सिव्हिल चौक – मुर्गी नाला- जगदंबा चौक – ते गांधीनगर पर्यंतचा रस्ता व्यवस्थित पद्धतीने विकसित केला तर नक्कीच सात रस्त्यातील रंगभवन या रस्त्यावरील वाहतुकीचा लोड कमी होईल.











