सोलापूर : मुलीचा ‘आरटीई’ अंतर्गत शाळा प्रवेश घेण्यासाठी लागणारे प्रमाणपत्र देण्यासाठी ३०० रुपयांची लाच घेताना महापालिका शिक्षण मंडळ विभागातील लिपीक प्रभावती अंबादास वाईटला (कस्सा) (वय ५८, रा. माधवनगर, लक्ष्मीनारायण टॉकीजजवळ) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी जेरबंद केले. याबाबत एका व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. वाईटला यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने केली.