• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणां विरुद्ध उत्तर सोलापुरात ‘काळी दिवाळी’…

Yes News Marathi by Yes News Marathi
November 13, 2026
in मुख्य बातमी
0
राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणां विरुद्ध उत्तर सोलापुरात ‘काळी दिवाळी’…
0
SHARES
0
VIEWS

​
​मुख्यमंत्र्यांना पाठवला ‘सामूहिक प्रतीकात्मक शेतकरी राजीनामा’; सरसकट कर्जमाफीसह हेक्टरी ५० हजारांच्या मदतीची मागणी
​
येस न्यूज मराठी : दिवाळी पाडव्याचा मुहूर्तावर राज्यात पडलेला भीषण दुष्काळ, पिकांचे झालेले अतोनात नुकसान आणि सरकारने केलेली तटपूंजी मदत याविरोधात उत्तर सोलापूर तालुक्यात गुळवणी येथे ‘काळी दिवाळी’ साजरी करण्यात आली. खा. प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भारत जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेताच्या बांधावर जाऊन खर्डा-भाकरी खाऊन राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

​राज्यातील प्रत्येक घरामध्ये दिव्यांचा लखलखाट सुरू असताना, बळीराजाच्या घरात मात्र आर्थिक संकटाचा अंधार पसरला आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाने जाहीर केलेली हेक्टरी ₹११ हजार मदत आणि ₹५ हजार अग्रिम रक्कम प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. खते, बियाणे, मजुरीचा वाढता खर्च आणि हमीभावाचा अभाव यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला असून, शासनाने पोकळ आश्वासने न देता थेट भरीव मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली.

​मुख्यमंत्र्यांना ‘सामूहिक प्रतीकात्मक शेतकरी राजीनामा’

या आंदोलनादरम्यान तालुका काँग्रेस अध्यक्ष भारत जाधव यांनी ‘सामूहिक प्रतीकात्मक शेतकरी राजीनामा’ पत्राचे वाचन केले. “आमची शेती ही आमची ओळख आणि जगण्याचे साधन आहे; मात्र जर शासनाच्या धोरणांमुळे शेती करणेच अशक्य होणार असेल, तर आम्ही शेती कशी करावी?” असा सवाल करत हा राजीनामा आता मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात येणार असल्याचे जाधव यांनी जाहीर केले. अन्नदात्याला लाचार करणाऱ्या व्यवस्थेविरुद्धचा हा तीव्र रोष असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

​आंदोलनातील प्रमुख मागण्या –

​राज्यातील व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जाचक अटींशिवाय तातडीने सरसकट संपूर्ण कर्जमाफी द्यावी.
​पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी ₹५०,००० ची सन्मानजनक आर्थिक मदत त्वरित खात्यावर जमा करावी.
​मागील वर्षीच्या सोयाबीन पीक विम्याची थकीत रक्कम सर्व पात्र शेतकऱ्यांना विनाविलंब वितरित करावी.
​आपत्कालीन मदत व विम्याची रक्कम कोणत्याही तांत्रिक अडचणींशिवाय थेट बँक खात्यात जमा करावी.
​जनावरांसाठी चारा डेपो आणि पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ टँकर सुरू करावेत.
​”शेतकरी जगला तरच देश जगेल,” असा निर्धार व्यक्त करत शासनाने या मागण्या तातडीने मान्य न केल्यास आगामी काळात लोकशाही मार्गाने अधिक तीव्र आणि व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

​या आंदोलनात तालुका काँग्रेस अध्यक्ष भारत जाधव यांच्यासह संजय पौळ, सोमनाथ भोसले, सचिन गुंड, अमोल पांढरे, राजू शिंदे, शुभम शिराळ, विनायक भोसले, अरुण जाधव, सागर राठोड, अप्पाशा आयवळे, विठ्ठल काळे, रामभाऊ गेजगे, गणेश भुसे तसेच गुळवंची परिसरातील शेतकरी पांडुरंग भोसले, बाळासाहेब पवार, दादासाहेब भोसले, विठ्ठल गायकवाड, दत्तू इंगळे, मारुती इंगळे, पुष्कराज भोसले, बिभीषण भोसले, अण्णा गड्डे, हणमंत कोरके यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous Post

सोलापूर महानगरपालिकेतील भाजप नगरसेवक मधुसूदन जंगम यांचे निधन

Related Posts

सोलापूर महानगरपालिकेतील भाजप नगरसेवक मधुसूदन जंगम यांचे निधन
मुख्य बातमी

सोलापूर महानगरपालिकेतील भाजप नगरसेवक मधुसूदन जंगम यांचे निधन

November 13, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात ; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
मुख्य बातमी

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात ; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

November 13, 2026
जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान
मुख्य बातमी

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

November 12, 2026
क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे
मुख्य बातमी

क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे

November 12, 2026
सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!
मुख्य बातमी

सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!

November 12, 2026
दिवाळीत सोलापुरात वाहन खरेदीचा उत्साह; दुचाकींसह चारचाकींच्या खरेदीला पसंती
मुख्य बातमी

दिवाळीत सोलापुरात वाहन खरेदीचा उत्साह; दुचाकींसह चारचाकींच्या खरेदीला पसंती

November 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणां विरुद्ध उत्तर सोलापुरात ‘काळी दिवाळी’…

राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणां विरुद्ध उत्तर सोलापुरात ‘काळी दिवाळी’…

November 13, 2026
सोलापूर महानगरपालिकेतील भाजप नगरसेवक मधुसूदन जंगम यांचे निधन

सोलापूर महानगरपालिकेतील भाजप नगरसेवक मधुसूदन जंगम यांचे निधन

November 13, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात ; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात ; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

November 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026