येस न्युज नेटवर्क : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंती दिनानिमित्त डफरीन चौक येथील महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्यास विभागीय अधिकारी सारिका आकुलवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी उद्यान अधीक्षक रोहित माने,मराठा सेवा संघाचे विवेक पाटील,अमोल सुरवसे,श्रीकांत घाडगे,धीरण गड्डा, दिलीप भम्बीरे,विक्रम पाटील,सुरेश लिंगराज आदी मान्यवर उपस्थित होते.