सोलापूर प्रतिनिधी: शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी अचानक राजीनामा दिल्यानंतर दक्षिण आणि अक्कलकोट विधानसभा जिल्हाप्रमुख पदी संतोष सिद्धगोंडा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यात शिवसेनेला पुन्रवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण तन-मन धनाने काम करू अशी ग्वाही संतोष पाटील यांनी दिली आहे.
तर संतोष पाटील यांच्या निवडीची घोषणा मातोश्री वरूनच थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी आता संतोष पाटील जिल्हाप्रमुख काम करणार आहे.










