• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 21, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रोटरी ३१३२ च्या प्रांतपाल स्वाती हेरकल , डॉ. राजीव प्रधान व सुहासिनी शाह यांच्या उपस्थितीत रोटरी रेडक्रॉस थॅलेसेमिया सेंटर चे लोकार्पण

by Yes News Marathi
June 28, 2024
in इतर घडामोडी
0
रोटरी ३१३२ च्या प्रांतपाल स्वाती हेरकल , डॉ. राजीव प्रधान व सुहासिनी शाह यांच्या उपस्थितीत रोटरी रेडक्रॉस थॅलेसेमिया सेंटर चे लोकार्पण
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरात प्रथमच थॅलेसेमिया रूग्णांसाठी सुसज्ज असे “रोटरी रेडक्रॉस थॅलेसेमिया सेंटर” चे लोकार्पण शुक्रवारी रोटरी जिल्हा ३१३२ च्या प्रांतपाल स्वाती हेरकळ, यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रिसिजन फौंडशेन च्या डॉ. सुहासिनी शहा आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी चे चेअरमन डॉ. राजीव प्रधान यांची प्रमुख उपस्थिती होती.

रोटरी इंटरनॅशनलकडून डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या प्रांतपाल रोटे स्वाती हेरकल आणि भावी प्रांतपाल रोटे जयेश पटेल यांच्या अथक प्रयत्नाने या प्रकल्पासाठी ५०७१० डॉलर्सची ग्रँट (निधी) मंजूर झाली आहे. रोटरी क्लब ऑफ सोलापूरची ही पहिलीच ग्लोबल ग्रँट आहे. यामध्ये अमेरिकेतील रोटे मीना पटेल यांची फार मोठी मोलाची मदत देऊ केली आहे. हे सेंटर, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, डफरिन चौक येथे स्थापन झाले आहे.

अमेरिकेच्या माधुश्री घाडगे यांनी ३१, ४२७.९० डॉलर्स , फाल्गुनी व मनीषा पटेल यांनी प्रत्येकी १०५० डॉलर्स तर सोलापूरच्या सुहासिनी शाह (प्रिसीजन फौंडेशन) यांच्या १३०० डॉलर्स चा या निधी मध्ये समावेश आहे.

इंडीयन रेडक्रॉस सोसायटी येथील 1987 मध्ये सुरु झालेल्या थॅलेसेमिया सेंटर मध्ये थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांना मोफत रक्त दिले जाते. या निधीमुळे अनेक थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांना मदत होणार आहे. थॅलेसेमिया हा एक प्रकारचा रक्ताचा अनुवंशिक आजार आहे, ज्यामध्ये रुग्णाला वारंवार रक्त द्यावे लागते. हा आजार विशेषकरून लहान मुलांमध्ये आढळतो. आणि त्यांचे आयुष्य खरंच खूप अवघड होते. म्हणूनच हा आजार होऊच नये यास्तव काम करणे फार महत्त्वाचे आहे. यामध्ये विवाहपूर्व आजाराची तपासणी , माहिती देणे आणि समुपदेशन द्वारे रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबाना पुढील त्रास टाळणे शक्य होणार आहे. हा आजार होऊच नये यासाठी स्क्रीनिंग, डिटेक्शन, ट्रीटमेंट, कौन्सिलिंग अशा अनेक पातळ्यांवरती काम येथे केले जाणार आहे. म्हणजेच परिपूर्ण अशा पद्धतीने हे सेंटर थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी कसे उपयोगी होईल आणि त्यांचे आयुष्य सुसह्य होण्यास त्यांना कशी मदत होईल याकडे लक्ष देईल. यासाठी इंडीयन रेड क्रॉस सोसायटी, रोटरी परिवार सदस्य आणि रोटरॅक्टर्स यांच्या सहभागातून हे कार्य करणार असल्याचे अध्यक्ष डॉ . ज्योती चिडगुपकर यांनी सांगितले.

लोकार्पण पश्चात बोलताना स्वाती हेरकल यांनी रोटरी आंतरराष्ट्रीय स्तरावर करीत असलेल्या अनेक समाजपयोगी कामांविषयी माहित देत ग्लोबल ग्रांट अन्वये कित्येक करोड रुपयांचा निधी भारतातील विविध भागात वापरला जात असल्याची माहिती दिली.
डॉ. राजीव प्रधान यांनी थॅलॅसेमिया ग्रस्त बालकांचे पालक व त्यांची तारांबळविषयी सांगत गोपाबाई दमाणी रक्तकेंद्र द्वारे सुमारे ३७ वर्षांपासून थॅलेसेमिया रुग्णांना देण्यात येणाऱ्या मोफत रक्तपुरवठा विषयांची माहिती दिली. अश्या रुग्णांना प्रत्येक सात दिवसास किंवा पंढरवाड्यास रक्त बदलावे लागते आणि हे रुग्णास जिवंत असेपर्यंत करावे लागते अशी माहिती दिली. हा रोग अनुवांशिक असून त्यासाठी समुपदेशन व वेळोवेळी इलाज अत्यंत गरजेचे आहे. आणि म्हणूनच हे केंद्र त्या रुग्णांसाठी वरदान रुपी ठरणार आहे असं त्यांनी प्रतिपादन केले.

याप्रसंगी प्रिसिजन फौंडशेन च्या डॉ. सुहासिनी शहा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अश्या ह्या समाजपयोगी कार्यात सहभागी होण्यात भाग्य लाभल्याचे सांगत रोटरी व रेडक्रॉस चे आभार मानले आणि ह्यापुढेही सर्वोतपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

रोटरी क्लब च्या सचिवा विद्या मणुरे यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी माजी प्रांतपाल झुबिन अमारिया, रवींद्र साळुंके सह सीए राजगोपाल मिनियार, अविनाश मठपती, केतन वोरा, भरत शाह, कालिदास जाजू सह रोटरी क्लब सोलापूर चे पदाधीकारी, सदस्य सह इंडियन रेड क्रॉस सोसायटी सोलापूरचे सह सचिव खुशाल देढीया या पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांची ओळख उपाध्यक्ष रोटे ,सुनील माहेश्वरी यांनी करून दिली तर सूत्र संचालन रोटे धनश्री केळकर यांनी केले.

Tags: Rajeev PradhanRotary 3132 Governor Swati HerkalSuhasini Shah
Previous Post

मंगळवेढ्याचा नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

Next Post

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल तडजोड करणार नाही माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप

Next Post
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल तडजोड करणार नाही माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबद्दल तडजोड करणार नाही माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group