• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
May 13, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
0
SHARES
7
VIEWS

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदवी (U.G.) व पदव्युत्तर पदवी (P.G.) अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नाविन्यपूर्ण पारंपारिक व व्यावसायिक अभ्यासक्रम नव्याने सुरू झाल्याची माहिती प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी दिली.

पदवी अभ्यासक्रमांतर्गत बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स, एन्व्हायर्नमेंटल सायन्स), तसेच बी.एस्सी. फार्मास्युटिकल अँड फाईन केमिकल टेक्नॉलॉजी, बी.एस्सी इसीएस (एनटायर कम्प्युटर सायन्स) यांसारख्या अभ्यासक्रमांसाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. बीसीए, बीबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटीद्वारे प्रक्रिया सुरू आहे. फाईव्ह इयर इंटिग्रेटेड एम टेक इन कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठीही प्रवेश देणे चालू आहे.

अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (AEDP) अंतर्गत बी.एस्सी. (फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग अँड क्वालिटी), पेंट टेक्नॉलॉजी, शुगर टेक्नॉलॉजी, टेक्सटाइल डिझाईन तसेच बी.कॉम. (BFSI) व बी.ए. (मीडिया अँड मास कम्युनिकेशन) अभ्यासक्रमांना देखील थेट प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला तसेच विद्यापीठातील संकुलना भेट द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रवेश परीक्षेद्वारे एम.एस्सी.केमिस्ट्री ( पॉलिमर, ऑरगॅनिक, इंडस्ट्रियल, मेडिसिनल), एम.एस्सी कम्प्युटर सायन्स, मॅथेमॅटिक्स, स्टॅटिटिक्स, बायो-स्टॅटिस्टिक्स, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायोइन्फॉर्मॅटिक्स), एम.एस्सी. इलेक्ट्रॉनिक सायन्स, फिजिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स/मटेरियल सायन्स एनर्जी स्टडीज, एन्व्हायरमेंटल सायन्स तसेच एम.ए. (मास कम्युनिकेशन) आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी रोजी ऑनलाईन प्रवेश पूर्व परीक्षा होत आहे.

तसेच विद्यापीठ संकुलातील काही अभ्यासक्रमांसाठी थेट प्रवेश (Direct Admission) प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये एम.एस्सी. अप्लाइड जिओलॉजी, जिओ इन्फॉर्मेटिक्स, एम.ए. प्राचीन भारतीय इतिहास व पुरातत्त्वशास्त्र, ग्रामीण विकास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, मानसशास्त्र या अभ्यासक्रमांना थेट प्रवेश देण्यात येणार आहे. एम ए (मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, उर्दू, पाली, प्राकृत आणि कन्नड), एम ए (म्युझिक, ड्रामा, तबला) एम ए योगा याही अभ्यासक्रमांना थेट प्रवेश होणार आहे. एम.कॉम., एमबीए (सीईटीद्वारे), एमसीए (सीईटीद्वारे) तसेच पाच वर्षांचा इंटिग्रेटेड एम.टेक. (कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी) हेही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तज्ञ मार्गदर्शक, अद्यावत सोयी सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, क्रीडांगणे, लॅबोरेटरीज, इमारत आदी पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांना निवासासाठी वस्तीगृहाची देखील सोय राहणार आहे. विद्यापीठाच्या www.sus.ac.in संकेतस्थळावरून देखील अधिक माहिती घेता येणार आहे. यासाठी विद्यार्थी व पालकांना विद्यापीठात भेट देता येणार आहे. प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी विद्यार्थी व पालकांनी विद्यापीठाशी संपर्क, साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेत डॉ. गौतम कांबळे, डॉ. विकास पाटील, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, डॉ. अंबादास भासके आदी उपस्थित होते.

Previous Post

सोलापुरात शुक्रवारी पुन्हा रंगणार मनपा करवाढीचे नाट्य…!

Next Post

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

May 13, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
सोलापुरात शुक्रवारी पुन्हा रंगणार मनपा करवाढीचे नाट्य…!

सोलापुरात शुक्रवारी पुन्हा रंगणार मनपा करवाढीचे नाट्य…!

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • SSSKBCA संघाचा दणदणीत विजय..

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026