पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेला विविध विषयांवर निवेदन

0
22

पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांची 30 ऑगस्ट रोजी भव्य मिरवणूक सोहळा निघणार आहे तरी मिरवणुकीच्या मार्गावर खड्डे बुजवणे फिरता शौचालयाची व्यवस्था करणे आणि महिलांसाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने बस सेवा मोफत देण्यात यावी अशी मागणी पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शितल तेली उघले आणि सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली याविषयी अधिक माहिती पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का यांनी दिली.
यावेळी पद्मशाली युवक संघटनेचे सचिव श्रीकांत दासरी ,कार्याध्यक्ष कुमारगौरव कुडक्याल प्रेसिडेंट मनोहर माचर्ला, उपाध्यक्ष नागेश बंडी, जिल्ला ,अंबादास कुडक्याल ,आणि पद्मशाली युवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थिती होते