श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी शशिकांत बिराजदार

0
25

सोलापूर – सोलापूर बाळीवेस येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या यंदाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी शशिकांत बिराजदार उपाध्यक्षपदी प्रसाद भिमदे, सिद्धार्थ खुने, अमोल साखरे तर सचिवपदी सागर मुस्तारे यांची एकमताने निवड करण्यात आली.
मंडळाच्या वार्षिक सर्व साधारण सभेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. वार्षिक सर्व साधारण सभा येथील श्री मंदिरात घेण्यात आली. मंडळाचे मार्गदर्शक तथा सिध्देश्वर देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब भोगडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या वार्षिक बैठकीत सर्व प्रथम मंडळाचे विश्वस्त खजिनदार केदार मेंगाणे यांनी वर्षाचा अहवाल सादर केला त्यास मान्यता देण्यात आली.
वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूत्रसंचालन व स्वागत मंडळाचे ट्रस्टी सचिव मल्लीनाथ खुने यांनी केले. मंडळाचे नूतन उत्सव अध्यक्ष शशिकांत बिराजदार यांनी या वेळी नाविन्य पूर्ण मिरवणूक तथा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या ऐतिहासिक मंडळाची परंपरा यंदाच्या वर्षी कायम असून हा गणेशोस्तव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. उत्सव प्रिय सोलापूरकरा मध्ये शांतता पूर्ण मिरवणूक तथा आदर्श गणेशोस्तव मंडळ अशी ख्याती असणाऱ्या मंडळाची ओळख आजतागायत कायम राखल्या बद्दल मंडळाचे चिदानंद मुस्तारे यांनी या वेळी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
नूतन उत्सव समिती अध्यक्ष शशिकांत बिराजदार यांच्या हस्ते श्रीं ची महाआरती करण्यात आली. श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुधीर थोबडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे उपाध्यक्ष प्रकाश वाले, मल्लिनाथ मसरे, शिवशंकर कोळकुर, नागनाथ चितकोटी, गुरुलिंग समाणे, शिवानंद बुगडे, रामचंद्र जोशी, बीप्पीन धुम्मा, बाळासाहेब मुस्तारे, संदेश भोगडे, सोमनाथ मेंगाणे, राजशेखर विजापूरे, उमेश वर्धा, जगदीश हिरेहब्बू, प्रविण वाले, प्रतिक थोबडे, आनंद मुस्तारे, विकास धुम्मा आदींची प्रमुख उपस्थित होती.

कसबा गणपती नूतन पदाधिकारी निवड – 2023-2024
• उत्सव अध्यक्ष : शशिकांत बिराजदार
• उपाध्यक्ष : प्रसाद भिमदे, सिद्धार्थ खुने, अमोल साखरे
• सचिव : सागर मुस्तारे
• खजिनदार : केदार मेंगाणे
• प्रसिद्धीप्रमुख : पुष्काराज मेत्री, नीरज मानवी
• मिरवणूक प्रमुख : नागनाथ मेंगाणे, गिरीराज निंगदळी, श्रीशैल भोगडे, सुमित हब्बू,
सागर हिरेहब्बू, गिरीष किवडे, ओंकार समाणे
• लेझीम प्रमुख : गिरीराज भोगडे, विनायक शरणार्थी, शांतेश स्वामी, शशांक खुने,
महेश अंकुशे, जयराज मेंगाणे, योगेश हदरे
• पूजा समिती : गिरी स्वामी, सिद्धू स्वामी, संदीप जोशी, गुरू पटणे, जीवन जोशी, रवी भोगडे, शिवराज कडगची, संजय बिराजदार