• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राजा माने यांना सुधारककार आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
July 12, 2022
in इतर घडामोडी
0
राजा माने यांना सुधारककार आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
0
SHARES
1
VIEWS

कराडच्या इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचा उपक्रम

मुंबई /प्रतिनिधी – सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या १६६ व्या जयंती निमित्त कराड येथील इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्यावतीने या वर्षीपासून प्रथमच विविध माध्यम प्रकारातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दिले जात आहेत. ज्येष्ठ संपादक राजा माने यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुधारककारांच्या टेंभू,ता. कराड,जि.सातारा या जन्मगावी गुरुवार दि १४ जुलै रोजी सकाळी १० वाजता पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. या सोहळ्यात महाराष्ट्रातील ६ पत्रकारांना पुरस्कार सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे,जिल्हाधिकारी शेखर सिंह, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंन्सल, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान टेंभू गावचे लोकनियुक्त सरपंच युवराज भोईटे भूषविणार आहेत. यावेळी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील, तहसिलदार विजय पवार ,उद्योजक रामकृष्ण वेताळ, पत्रकार संघाचे सातारा शहर अध्यक्ष विनोद कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.


सन २०२२ चा गोपाळ गणेश आगरकर सुधारक पुरस्कार सोलापूर येथील ज्येष्ठ संपादक राजा माने,सातारा येथील दैनिक ग्रामोध्दारचे संपादक बापूसाहेब जाधव,दैनिक सकाळ पुणे उपसंपादक आशिष तागडे, सिंधुदुर्ग लाईव्हचे कार्यकारी संपादक अर्जुन धस्के,झी २४ तास चॅनलचे सातारा जिल्हा प्रतिनिधी तुषार तपासे,दैनिक पुढारी कोल्हापूरच्या स्नेहा मांगुरकर यांना प्रदान करण्यात येणार आहेमहाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक,पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म कराड तालुक्यातील टेंभू येथे १४ जुलै १८५६ साली अत्यंत सामान्य कुटुंबात झाला.आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌-निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला.


बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांची कर्मभूमी असलेल्या टेंभू येथील पत्रकारांच्या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहावे,असे आवाहन इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचे विश्वस्त विकास भोसले,नितीन ढापरे ,संदीप चेणगे, प्रमोद तोडकर, अशोक मोहने, माणिक डोंगरे यांनी केले आहे.

Previous Post

राजकारण सोलापूरचे : महेश कोठे यांच्या या भूमिकेकडे काँग्रेस -राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नजरा…!

Next Post

सोलापुरात 26 पेट्या देशी विदेशी दारु जप्त; राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाची कारवाई

Related Posts

हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 25, 2026
ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!
इतर घडामोडी

ट्रोलिंगला उत्तर देण्यापेक्षा पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य; डॉ. स्मिता जाधव यांची संयमी भूमिका चर्चेत!

October 22, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न

October 22, 2026
सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये ‘स्वच्छ, सुंदर व निरोगी’ अभियान उत्साहात
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये ‘स्वच्छ, सुंदर व निरोगी’ अभियान उत्साहात

October 22, 2026
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज
इतर घडामोडी

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज

October 22, 2026
श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात
इतर घडामोडी

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

October 21, 2026
Next Post
सोलापुरात 26 पेट्या देशी विदेशी दारु जप्त; राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाची कारवाई

सोलापुरात 26 पेट्या देशी विदेशी दारु जप्त; राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाची कारवाई

ताज्या बातम्या

हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

हार्टफुलनेस ध्यान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

October 25, 2026
आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!

आता डीसीसी बँकेच्या निवडणुकीत पुन्हा पालकमंत्री विरुद्ध मोहिते-पाटील महासंग्राम…!

October 25, 2026
अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय

अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत बिपिनभाई पटेल पॅनेलचा दणदणीत विजय

October 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026