• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
August 11, 2026
in Blog
0
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर- युवकांमधील सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि समाजोपयोगी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारा जिल्हा युवा पुरस्कार सन २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा युवा पुरस्कार व युवा महोत्सव समिती, सोलापूरच्या बैठकीत सविस्तर छाननी, गुणांकन व चर्चेनंतर युवक, युवती आणि संस्था या तीन प्रवर्गातील पुरस्कारार्थींची सर्वानुमते निवड करण्यात आली.

युवक प्रवर्ग :
मुजम्मील खलील कमलीवाले, पंढरपूर, जि. सोलापूर यांची युवक प्रवर्गातून निवड करण्यात आली आहे. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण तसेच मानवतावादी क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य केले आहे. गरजू व वंचित घटकांसाठी आरोग्य शिबिरे, रक्तदान जनजागृती, औषधे व जीवनावश्यक साहित्याचे वितरण, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान अशा विविध उपक्रमांतून त्यांनी समाजसेवा केली आहे. युवकांना सामाजिक कार्याशी जोडण्याबरोबरच सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मतेसाठी केलेल्या त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे.

युवती प्रवर्ग :
डॉ. चंदाराणी अशोक क्षीरसागर, कुरुल, ता. मोहोळ, जि. सोलापूर यांची युवती प्रवर्गातून निवड करण्यात आली आहे. वैद्यकीय व्यवसायासोबत सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण व गरजू नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे. आषाढी यात्रेच्या कालावधीत वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी, औषधोपचार व औषध वितरणासह विविध आरोग्यविषयक उपक्रम त्यांनी राबविले. आरोग्य सेवा, जनजागृती, समाजसेवा आणि राष्ट्र उभारणीतील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

संस्था प्रवर्ग :
जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, कोंडी, ता. उत्तर सोलापूर, जि. सोलापूर यांची संस्था प्रवर्गातून निवड करण्यात आली आहे. संस्थेने शिक्षण, महिला सक्षमीकरण, समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्य, आपत्ती व्यवस्थापन, क्रीडा, पर्यावरण, आरोग्य तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. विविध समाजोपयोगी क्षेत्रांमध्ये सातत्याने केलेल्या बहुआयामी व व्यापक कार्याची दखल घेऊन संस्थेची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिनी सोलापूर येथे पुरस्कार वितरण
या पुरस्काराचे वितरण दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सोलापूर येथे करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील युवक, युवती आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या संस्थांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे तसेच त्यांच्या कार्यातून इतर युवकांना प्रेरणा मिळावी, हा जिल्हा युवा पुरस्कारामागील प्रमुख उद्देश आहे. असे तालुका क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Previous Post

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Next Post

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

Related Posts

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार
Blog

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी
Blog

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी
Blog

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Blog

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 2, 2026
दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?
Blog

दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

September 29, 2026
सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर
Blog

सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर

September 29, 2026
Next Post
सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026