सोलापूर : श्री रमा जगदीश महिला बहुद्देशीय उत्कर्ष संस्थेच्यावतीने जगदीश नाईक व जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ ११० कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे आणि रमा जगदीश संस्थेचे मार्गदर्शक जगदीश नाईक यांच्या वाढदिनी विजापूर रोड भागातील दोन नंबर झोपडपट्टीतील निराधार विकलांग व आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीचे जीवन जगणार्या ११० कुटुंबांना एक किलो तूर डाळ, एक किलो साखर , एक किलो गूळ , एक किलो तेल व एक किलो शेंगदाणे असे वाटप करण्यात आले . हे वाटप मनोरमा परिवाराच्या मार्गदर्शिका शोभाताई श्रीकांत मोरे,सुनीता नाईक, सुनिल पाच्कवडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.