• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार पालवी संस्थेच्या मंगलताई शहा यांना जाहीर

Yes News Marathi by Yes News Marathi
July 30, 2025
in इतर घडामोडी
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार पालवी संस्थेच्या मंगलताई शहा यांना जाहीर
0
SHARES
1
VIEWS

विद्यापीठास 21 वर्षे पूर्ण; शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा प्रतिष्ठेचा व मानाचा जीवनगौरव पुरस्कार पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संस्थापिका श्रीमती मंगलताई शहा यांना जाहीर झाल्याची घोषणा कुलगुरु प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. यात सोलापूर ही जन्मभूमी, कर्मभूमी व ऋणानुबंध असणाऱ्या महनीय व्यक्तीस जीवनगौरव हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो. यंदाच्या या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी श्रीमती मंगलताई शहा या ठरल्या आहेत. सामाजिक क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. पालवी संस्थेच्या माध्यमातून एचआयव्ही एडसग्रस्त अनाथ बालकांचे संगोपन व त्यांना शिक्षण देण्याचे महत्वपूर्ण कार्य मंगलताई शहा यांच्याकडून होत आहे. यानिमित्त विद्यापीठाच्या अधिकार मंडळाकडून जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना विनंती करण्यात आली, त्यांनी सदरील विनंती स्वीकारली आहे. रोख 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

शुक्रवार, दि. 1 ऑगस्ट 2025 रोजी विद्यापीठाचा 21 वा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे. सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम कुलगुरू प्रा. महानवर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या समारंभास मुख्य अतिथी म्हणून नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम, नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे तर प्रमुख अतिथी म्हणून एचएसएनसी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. हेमलता बागला, आमदार श्री गोपीचंद पडळकर हे उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

याचबरोबर विद्यापीठाच्या विविध पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते, त्यानुसार तज्ञ समितीने विविध पुरस्कारांची देखील निवड केली आहे. या ही पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी होणार आहे. विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेसाठी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, परीक्षा संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, सहाय्यक कुलसचिव सोमनाथ सोनकांबळे, जनसंपर्क अधिकारी राहुल वंजारे, डॉ. अंबादास भासके आदी उपस्थित होते.

यांना जाहीर झाले पुरस्कार
1) उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सोलापूर.
2) उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार: प्राचार्य डॉ. विजय अनंत आठवले, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर.
3) उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय): डॉ. भाग्येश बळवंत देशमुख, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर.
4)उत्कृष्ट शिक्षकेत्तर अधिकारी पुरस्कार (वर्ग एक व दोन विद्यापीठ): राजीव उत्तम खपाले, लेखापाल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
5)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार वर्ग तीन: डॉ. शिरीष शामराव बंडगर, वरिष्ठ लिपिक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
6)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार वर्ग चार: नवनाथ नागनाथ ताटे, चौकीदार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.
7)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (महाविद्यालय): राजेंद्र शंकर गिड्डे, वरिष्ठ लिपिक, मारुतीराव हरिराव महाडिक कला व वाणिज्य महाविद्यालय, मोडनिंब
8)उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (चतुर्थश्रेणी कर्मचारी महाविद्यालय): दत्ता निवृत्ती भोसले, ग्रंथालय परिचर, छत्रपती श्री शिवाजी रात्र महाविद्यालय सोलापूर आणि डॉ. रेवप्पा सिद्धाप्पा कोळी, प्रयोगशाळा परिचर, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर.


जीवनगौरव पुरस्कार प्राप्त मंगलताईंविषयी…
एचआयव्ही एडसग्रस्त अनाथ बालकांच्या संगोपनाकरता मंगलताई शहा यांनी 2001 मध्ये पंढरपूरमध्ये ‘पालवी’ नावाची संस्था स्थापन केली. दोन मुलांच्या प्रवेशापासून सुरू झालेली ही संस्था आता बहू अंगांनी विस्तारली आहे. संस्थेने या मुलांकरता स्वत:ची शाळा, गोशाळा सुरू केली आहे. एडसग्रस्त अनाथ बालकांबरोबरच अत्याचार पीडित कुमारी माता, मनोरुग्ण माता, विवंचनेने पीडित स्त्रिया यांचा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी सांभाळ केला जातो. परित्यक्ता, विधवा, वृद्ध, मनोरूग्ण यांना आधार दिला जातो. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई काम, शेती काम, प्लंबिंग इत्यादी कामे त्यांना शिकवली जातात. याखेरीजही संस्थेतर्फे वंचितांकरता अनेक प्रकल्प राबवले जातात. मंगलाताईंनी प्रभा-हिरा प्रतिष्ठानच्या अंतर्गत ‘पालवी’ या संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेचा असा विश्वास आहे की, जन्माला आलेली सर्व बालके समान आहेत आणि आरोग्य, शिक्षण, सुरक्षित आणि कलंकमुक्त वातावरणासह प्रेमळ, आनंदाने भरलेले बालपण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे

Previous Post

मध्य रेल्वेकडून श्रीगणेश भक्तांसाठी आणखी एक दिलासा – श्रीगणेश उत्सवानिमित्त ४४ अतिरिक्त विशेष गाड्यांचे संचालन

Next Post

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू – मंत्री मंगल प्रभात लोढा

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू – मंत्री मंगल प्रभात लोढा

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू - मंत्री मंगल प्रभात लोढा

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026