• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

Yes News Marathi by Yes News Marathi
June 17, 2026
in Blog
0
क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!
0
SHARES
3
VIEWS

पूजा गवई ठरल्या ‘गोल्डन वूमन’; सोलापूर विद्यापीठाच्या महिला महोत्सवाचा दिमाखदार समारोप

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरविद्यापीठ महिला कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ‘महिला महोत्सव-२०२६’चा बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात राज्यातील पाच विद्यापीठांतील महिला कर्मचाऱ्यांनी क्रीडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आपल्या गुणवत्तेचा उत्कृष्ट आविष्कार सादर केला. क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पटकाविले, तर सांस्कृतिक स्पर्धेचे विजेतेपद महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या संघाने मिळविले. यावेळी पुणे विद्यापीठाच्या पूजा गवई यांना ‘गोल्डन वूमन’ पुरस्कार प्रदान करून विशेष गौरविण्यात आले.

विद्यापीठ परिसरात झालेल्या समारोप व पारितोषिक वितरण समारंभास प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून कवयित्री डॉ. स्वाती शिंदे-पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे, डॉ. प्रभाकर कोळेकर, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. अनिल घनवट आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण महोत्सव यशस्वीपणे पार पडला. प्रारंभी प्रभारी कुलसचिव तथा क्रीडा संचालक डॉ. अतुल लकडे यांनी प्रास्ताविक करून महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला.

या महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या पाच विद्यापीठांतील महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. स्पर्धांमधून महिलांमधील क्रीडा कौशल्य, सांस्कृतिक प्रतिभा, संघभावना आणि नेतृत्वगुणांचे दर्शन घडले.

क्रीडा स्पर्धांमध्ये रोड रेस प्रकारात पुणे विद्यापीठाच्या वैशाली उंबे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. राहुरीच्या राणी भील यांनी द्वितीय, तर गोंडवाना विद्यापीठाच्या गंगा राठोड यांनी तृतीय क्रमांक मिळविला. बॅडमिंटन स्पर्धेत पुण्याच्या पूजा गवई यांनी विजेतेपद मिळवित आपले वर्चस्व सिद्ध केले. शैलजा बोंद्रे, पुणे यांनी द्वितीय तर कविता काकडे, राहुरी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. खो-खो स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम, सोलापूर विद्यापीठाने द्वितीय तर गोंडवाना विद्यापीठाने तृतीय क्रमांक मिळविला. रस्सीखेच स्पर्धेत सोलापूर विद्यापीठाने विजेतेपद पटकावले, तर राहुरी विद्यापीठ द्वितीय आणि पुणे विद्यापीठ तृतीय क्रमांकावर राहिले.

सांस्कृतिक स्पर्धांमध्ये रांगोळी स्पर्धेत राहुरीच्या डॉ. शुभांगी कदम प्रथम, सोलापूरच्या सुप्रिया अनुभुले द्वितीय आणि नाशिकच्या ज्योती इटणकर तृतीय ठरल्या. वैयक्तिक गायन स्पर्धेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या चेतना पवार यांनी प्रथम क्रमांक मिळविला. अमृता खर्डेकर, नाशिक यांनी द्वितीय तर सोलापूरच्या अनिता भोसले यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. वैयक्तिक नृत्य स्पर्धेत पूजा गवई, पुणे यांनी पुन्हा एकदा प्रथम क्रमांक मिळवत आपल्या बहुआयामी प्रतिभेची छाप पाडली. सुवर्णा खैरनार, नाशिक यांनी द्वितीय तर निलोफर बागवान, सोलापूर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. समूहगीत स्पर्धेत नाशिक विद्यापीठ प्रथम, सोलापूर विद्यापीठ द्वितीय आणि पुणे विद्यापीठ तृतीय ठरले. समूह नृत्य स्पर्धेत सोलापूर विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळवून उपस्थितांची मने जिंकली. गोंडवाना विद्यापीठ द्वितीय तर नाशिक विद्यापीठाने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

समारोप कार्यक्रमात सहभागी स्पर्धक पूजा गवई, माधुरी आहेर आणि सुवर्णा खैरनार यांनी मनोगत व्यक्त करताना सोलापूर विद्यापीठाने प्रथमच आयोजित केलेल्या या महोत्सवाचे भरभरून कौतुक केले. राज्यातील महिला कर्मचाऱ्यांना एकत्र आणणारा आणि त्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा महोत्सव दरवर्षी आयोजित व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रमुख अतिथी डॉ. स्वाती शिंदे-पवार यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय समारोपात प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी विद्यापीठ भविष्यातही महिला कर्मचाऱ्यांसाठी अशा दर्जेदार स्पर्धा व महोत्सवांचे आयोजन करण्यासाठी कटिबद्ध राहील, असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. केदारनाथ काळवणे यांनी केले.

Previous Post

उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

Next Post

TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!

Related Posts

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत
Blog

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!
Blog

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी
Blog

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर
Blog

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत
Blog

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
भाजपची सोलापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठक सुरु
Blog

भाजपची सोलापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठक सुरु

August 20, 2026
Next Post
TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!

TOP 25 । ऑपरेशन टायगरच्या भीतीने मातोश्रीवर भूकंप, तर शरद पवार टेन्शनमध्ये…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026