• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मोहिते पाटलांच्या शाही विवाह सोहळ्याची अकलूज मध्ये जय्यत तयारी

Yes News Marathi by Yes News Marathi
March 8, 2025
in इतर घडामोडी
0
मोहिते पाटलांच्या शाही विवाह सोहळ्याची अकलूज मध्ये जय्यत तयारी
0
SHARES
0
VIEWS


राजघराण्यासह राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , सहकार , नाट्य , चित्रपट , उद्योग क्षेत्रातील असंख्य मान्यवरांची उपस्थिती

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या घराण्यातील चौथ्या पिढीच्या शुभ विवाह सोहळ्याची अकलूज मध्ये जय्यत तयारी करण्यात आली असून या विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील राजघराण्यातील मान्यवर व्यक्ती , राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , सहकार , नाट्य , चित्रपट , उद्योग आदी क्षेत्रातील असंख्य मान्यवरांची उपस्थिती तसेच सुमारे दीड लाख निमंत्रित मित्र परिवार उपस्थित राहणार आहे.


सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी आपले चिरंजीव व राज्याचे माजी उपमूख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा विवाह सोहळा 17 में 1971 मध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला होता . राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही लक्ष भोजन घालून त्यांनी आलेल्या प्रत्येक निमंत्रित पाहुण्यांचे व कार्यकर्त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले . त्यावेळी विहीरीत बर्फ , साखर व लिंबू रस टाकून आलेल्या पाहुणे मंडळींना सरबत पाजल्याचीही चर्चा जगभर झाली . देशी व विदेशी वृत्तपत्रांनी त्याची दखल घेत या विवाह सोहळ्याला प्रसिध्दी दिली .

त्यानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपले चिरंजीव आ रणजितसिंह मोहिते पाटील यांचा विवाह 1 डिसेंबर 1995 मध्ये असाच मोठ्या थाटामाटात साजरा केला . या विवाह सोहळ्याची देशभर चर्चा झाली .लाखो निमंत्रित व्यक्तींसह राजघराण्यातील अनेक मान्यवर , राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , सहकार , नाट्य , चित्रपट , उद्योग क्षेत्रातील असंख्य मान्यवरांची उपस्थिती या विवाह सोहळ्याला होती .

आता तब्बल 30 वर्षानंतर मोहिते पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील आ रणजितसिंह मोहिते पाटील यांचे जेष्ठ चिरंजीव विश्वतेजसिंह यांचा विवाह विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील चिखली येथील उदयसिंह सरनाईक यांची जेष्ठ कन्या चि सौ का शिवांशिका यांच्याशी शनिवार दि 8 मार्च 2025 रोजी सायंकाळी 6 वाजून 27 मिनीटे या गोरज मुहूर्तावर अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे होत आहे . या विवाह सोहळ्याच्या गेल्या दहा दिवसांपासून स्मृती भवन येथील महर्षी हॉलच्या प्रांगणात जेवणावळी सुरू असून सकाळी 11 ते 2 व सायंकाळीं 6 ते 9 असे दोन वेळ सुमारे 15 हजार निमंत्रित गावकऱ्यांना भोजन दिले जात आहे .

माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा संकुलावर मध्यभागी पुण्याच्या धनिक प्रोडक्शन या कंपनीने 60 बाय 60 चा भव्य विवाह मंडप उभारला असून त्याला सुंदर कमळाचा आकार देण्यात आला आहे . विवाह मंडपाच्या चारी बाजूनी निमंत्रीत, आमंत्रित पाहुणे मंडळी राजघराण्यासह राजकीय , सामाजिक , शैक्षणिक , सहकार , नाट्य , चित्रपट , उद्योग क्षेत्रातील असंख्य मान्यवरांना तसेच कार्यकर्त्यांना बसण्यासाठी जवळपास एक लाख खुर्च्या मांडण्यात आल्या आहेत तर क्रीडा संकुलाच्या गॅलरी मध्ये पन्नास हजार लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे . त्याशिवाय ज्यांना क्रीडा संकुलात जागा मिळणार नाही अशा व्यक्तींना विवाह सोहळा पाहता यावा यासाठी 10 बाय 10 चे 22 स्क्रिन संकुलात व महर्षी चौक येथे लावण्यात आल्या आहेत .
सायंकाळी 4 वाजता सदुभाऊ चौकातून वरदावा निघणार आहे . वरदाव्याची संपूर्ण व्यवस्था माजी उपसभापती अर्जूनसिह मोहिते पाटील हे पाहत आहेत . मुंबईचे 200 कलाकारांचे डान्स पथक , लेझीम पथक , ब्यांड पथक , डफडे , ढोली बाजा अशी मंडळी वरदाव्यात सहभागी होणार आहेत .

पार्किंग व्यवस्था
विवाह सोहळ्याच्या मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून सुमारे दहा हजार वाहनांची
पार्किंग व्यवस्था विजय मैदान , लक्ष्मी नारायण मैदान , नवीन बस स्थानक , जिजामाता कन्या प्रशाला येथे करण्यात आली आहे .

सहा हेलिपॅड
राजकीय , उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर हेलिकॉप्टरने येणार असल्याने सहा ठिकाणी हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे . एकंदरीतच दीड लाखापेक्षा अधिक निमंत्रित मंडळी विवाह सोहळ्याला येणार असल्याने जय्यत तयारी करण्यात आली आहे .
आज सायंकाळी अकलूज मध्ये मोहिते पाटील घराण्यात होणार शाही विवाह सोहळा

Previous Post

सोलापूरचे कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर यांनी घेतली राज्यपाल यांच्या भेट

Next Post

संतोष देशमुख यांच्या समोर हत्या झाली असा नव्हे तर ‘शहीद’ हा शब्द लागू शकतो-हर्षवर्धन सपकाळ…

Related Posts

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
Next Post
संतोष देशमुख यांच्या समोर हत्या झाली असा नव्हे तर ‘शहीद’ हा शब्द लागू शकतो-हर्षवर्धन सपकाळ…

संतोष देशमुख यांच्या समोर हत्या झाली असा नव्हे तर 'शहीद' हा शब्द लागू शकतो-हर्षवर्धन सपकाळ...

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026