पंचायत राज समिती कडून सायकल बॅंकेस १६ सायकली भेट .!

0
22

आमदारांकडून पुढाकार, सिईओ स्वामींचे उपक्रमाचे कौतुक

सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेले विविध नाविण्य पुर्ण उपक्रमाची दखल घेत पंचायत राज समितीचे सदस्यांनी स्वतःहून १६ सायकली भेट देऊन अधिकारी यांचे मनोबल उंचावले आहे.

पंचायत राज समितीचे अध्यक्ष डाॅक्टर. संजय रायमुलकर यांचे अध्यक्षतेखाली पंचायतराज आढावा व भेट या अंतर्गत अहवाल वाचन करणेत आले या प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेले विविध नाविण्य पुर्ण उपक्रम यांची माहिती सादर करणेची परवानगी सिईओ दिलीप स्वामी यांना दिली. आमदार विक्रम काळे यांनी पुढाकार घेऊन सर्व आमदार यांचे वतीने सिईओ दिलीप स्वामी यांचे कडे सायकली सुपूर्द करणेचा निर्णय घेणेत आला. सोलापूर. जिल्हा परिषदेने शाळे पासून मुलींनी दूर राहू नसे राबविलेला सायकल बॅंकेचा उपक्रमाचे सर्व आमदारांनी कौतुक केले. एवढ्यावर न थांबतां आज शाळेचा पहिला दिवस असल्याने त्यांनी प्रति आमदार. या प्रमाणे १६ सायकली भेट देऊन सुखद धक्का दिला. आमदार विक्रम काळे यांनी पुढाकार घेऊन सर्व सदस्यांची एकजुट दाखविली.

जिल्हा परिषदेचे प्रांगणात बैठक सुटे पर्यंत सायकली दाखल करणेत आले. स्वत सर्व आमदार यांनी मुलींसाठी सोलापूर जिल्हा परिषदेस १६ सायकली भेट दिल्या.
सायकली वर बसून पंचायत राज समितीचे अध्यक्ष संजय रायमुलकर, आमदार विक्रम काळे, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार कैलास पाटील, आमदार डाॅ. राहुल पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार सदाशिव खोत, आमदार महादेव जानकर, आमदार शेखर निकम, आमदार सुभाष धोटे, आमदार माधवराव पवार, डाॅ. विजयकुमार गावित, डाॅक्टर देवराव होळी, आमदार श्रीकृष्ण गजबे, आमदार विजय रहांगडाले, आमदार किशोर गजानन जोरगेवार, आमदार अंबादास दानवे, आमदार अमर राजुरकर, आमदार किशोर दराडे, आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सायकली प्रदान केल्या.

सिईओ दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील , शिक्षणाधिकारी डाॅ. किरण लोहार, उप शिक्षणाधिकारी संजय जावीर उपस्थित होते.

जिल्हा परिषेदेचे उपक्रम प्रेरणादायी – अध्यक्ष रायमुलकर

सोलापूर जिल्हा परिषदेने राबविलेले नाविण्यपुर्ण उपक्रम प्रेरणादायी आहेत असे मत पंचायतराज समितीचे अध्यक्ष डाॅ. संजय रायमुलकर यांनी व्यक्त केले. मुलींचे शिक्षणासाठी सायकल बॅक उपक्रम कौतुकास्पद आहे. आम्ही तर का मागे रहायचे. एक सायकल म्हणजे खुप मोठी मदत नाही पण इतर दानशुरांनी पुढे यावे ही त्या पाठी मागची भावना आहे.

पंचायत राज समितीने मनोबल उंचावलं – सिईओ दिलीप स्वामी

प्रशासनात काम करणारे अधिकारी व कर्मचारी प्रमाणिक पणे काम करतात. पंचायतराज समितीने केलेल्या कौतुका मुळे अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल उंचावले आहे. सायकल बॅंक उपक्रम चांगला यशस्वी ठरत असताना शाळेचे पहिल्या दिवशी स्वत पंचांगात समितीचे अध्यक्ष संजय संजय रायमुलकर व सदस्यांनी स्वत हून सायकल बॅ्केस १६ सायकली भेट दिल्या. ३५ नाविण्य पुर्ण उपक्रमाचे केलेले कौतुक आम्ही विसरणार नाही असे मत सिईओ दिलीप स्वामी यांनी व्यक्ती केले.

मुलींचे शिक्षणासाठी आमदरांचा पुढाकार – आमदार विक्रम काळे

सिईओ दिलीप स्वामी यांचे सारखे सिईओ चांगले काम करीत आहेत. मनाला खुप भावले. मुलींचे शिक्षणासाठी सायकल बॅंक उपक्रम व स्वच्छ सुंदर शाळा उपक्रमातून ८ कोटी लोकवर्गणी या सर्व बाबी लक्षात घेता आम्ही एक सायकल देणेचा निर्णय घेतला. शिक्षकांनी चांगले काम केले आहे. चांगले कामाचे कौतुक केले पाहिजे असे आमदार विक्रम काळे यांनी सांगितले.