पंचगंगा नदी पात्राबाहेर; कोल्हापुरात संततधार; तब्ब्ल ५८ बंधारे पाण्याखाली वाहतूक विस्कळीत

0
38

कोल्हापूर (सुधीर गोखले) – कोकणचे प्रवेशद्वार अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग सुरूच आहे काल सायंकाळ पासून पावसाचा जोर कमी होता मात्र धरण क्षेत्रांमध्ये पावसाचा जोर कायम आहे परिणामी नद्या दुथड्या भरून वाहत आहेत आज पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली असून जिल्ह्यातील तब्ब्ल ५८ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढला आहे जिल्ह्याच्या पश्चिम क्षेत्रामध्ये असणाऱ्या गगनबावडा पन्हाळा शाहूवाडी राधानगरी भुदरगड चंदगड तालुक्या मध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे येथील काही प्रमाणात धबधबे प्रवाहित झाले असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.
धरणे भरण्यास सुरुवात
यंदा पावसाने चांगलीच ओढ दिल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये खूप कमी पाणीसाठा राहिल्याने सर्वत्र चिंता निर्माण झाली होती मात्र गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील प्रमुख राधानगरी धरण ६० टक्क्याहून अधिक भरल्याने विद्युत निर्मिती सुरु करण्यात आल्याने कुंभी कासारी भोगावती नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आणि पाणी नदी पात्राबाहेर पडले.
दक्षिणद्वार सोहळा प्रतीक्षेत
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिहवाडी येथील यंदाच्या पावसाळ्यातील दक्षिणद्वार सोहळा अजून प्रतीक्षेत आहे आज सकाळी पाणी देवस्थान चौथऱ्यावर दाखल झाले मात्र दक्षिणद्वार सोहळ्यासाठी काही तास अजून प्रतीक्षा करावी लागेल मात्र भाविकांनी पाणी बघण्यासाठी आणि दर्शनासाठी मंदिर परिसरात एकच गर्दी केली आहे.