सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाच्या वतीने सोलापूरात रक्तदान शिबीराचे आयोजन…

0
45

सोलापूर: सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज सोलापूर व अखिल भारतीय सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज – सोलापूर जिल्हा संघटन समिती व महिला जिल्हा संघटन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुक्तेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या सहकार्याने सोलापूर शहरात १५ ऑगस्ट दिनाचे औचित्य साधून टिळक चौक येथील मुक्तेश्वर मंदिर गणेश हॉल मध्ये शिवशंभो ब्लड बँक यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या महान रक्तदान शिबिरामध्ये समाजबांधवांनी व महिलांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी दाखविली. याबाबत सोलापूर जिल्हा संघटन समिती व शिवशंभो ब्लड बँक यांच्या वतीने रक्तदात्यास सन्मान पत्र व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले तसेच
या शिवाय प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत बिनव्याजी कर्ज वाटप नाव नोंदणी शिबीर ही घेण्यात आले होते.

तसेच “आरोग्यम धनसंपदा” या ब्रीद वाक्याप्रमाणे केंद्र शासन व महाराष्ट्र शासन राज्यातील जनतेला आरोग्य कवच म्हणून “आयुष्यमान हेल्थ कार्ड” प्रदान करते या कार्ड मार्फत लाभार्थ्यांना ५ लाख रु पर्यंत विमा सुरक्षा आहे.
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्हा संघटन समिती अध्यक्ष नागेश वाघमारे व महिला जिल्हा संघटन समिती अध्यक्षा जयश्री चव्हाण , अखिल भारतीय सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज महिला संघटन समिती कोअर सदस्य राजश्री गवळी तसेच अमर गुमटे (उपाध्यक्ष) सचिव – अनिल छत्रबंद, संपन दिवाकर सदस्य – महेंद्र जाधव, गणेश चव्हाण,मंदार मिरजगावकर तसेच सदर कार्यक्रमास मुक्तेश्वर मंदिर ट्रस्टचे विश्वस्त श्री दिलीप गवळी , सुभाष गवळी ,विजय दास, किशोर चव्हाण, विवेक चव्हाण तसेच ज्येष्ठ समाजबांधव नागेश दास , श्रीकांत गवळी व गुरुदत्त चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.