लोकमंगल बँकेचे माजी सरव्यवस्थापक हरिश्चंद्र गवळी यांचे निधन

0
39

सोलापूर – शेटे नगर येथील रहिवाशी आणि लोकमंगल बँकेचे माजी सरव्यवस्थापक हरिश्चंद्र लक्ष्मण गवळी – भोसले ( वय ८२ ) यांचे बुधवारी दुपारी निधन झाले.भुविकास बँकेचे व्यवस्थापक, ब्रह्मदेव दादा माने बँकेचे वसुली अधिकारी, लोकमंगल बँकेचे सरव्यवस्थापक म्ह्णून त्यांनी जबाबदारी पार पाडली.लोकमंगल पतसंस्थेचे तज्ञ संचालक म्हणून ते सध्या काम पाहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. डॉकटर अमित भोसले यांचे ते वडील होते.पुना नाका स्मशानभूमीत सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.