येस न्युज मराठी नेटवर्क । कोरोनाचा धोका पुन्हा वाढलेला आहे, पुन्हा लॉकडाऊन करणं हा एक मार्ग आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे आज नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लॉकडाऊन संदर्भात भाष्य केलं.
पुन्हा लॉकडाऊन करणं हा एक मार्ग दिसतोय. जनतेने त्याकाळी जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य आता करतील, अशी अपेक्षा आहे.
माझी जनता नक्की सहकार्य करणार, असं ठाकरे म्हणाले. आता लस आली आहे. स्वत:हून पुढे येऊन कोरोना लस घ्यावी, यानंतरही मास्क वापरावा. कोरोना लस कुठेही कमी पडणार नाहीत, संपूर्ण राज्यात लसीकरणाची केंद्र उघडली आहे. काही ठिकाणी केंद्र वाढवली आहेत, असं ठाकरे यांनी सांगितलं.