महिला मेळाव्याची सुरुवात क्रांतीज्योती सावत्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आमच्या शाळेची विद्यार्थीनी रुपाली विष्णू भोसले( महाराष्ट्र पोलिस) हिच्या मातोश्री रंजना विष्णू भोसले यांच्या हस्ते करून झाली.
त्यानंतर महाराष्ट्र पोलीस म्हणून निवड झाल्याबद्दल कु. रूपालीच्या मातोश्री रंजना भोसले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व महिलांचा गुलाब पुष्प देवून व स्वागत गीताने स्वागत सन्मान करण्यात आला.

महिला मेळाव्याला माता भगिनींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. उपस्थित माताभागिनींनी शाळेतील महिला शिक्षिकांचा सन्मान केला.

या प्रसंगी ज्योती विनोद भोसले यांनी महिलांनी पार पाडायच्या विविध जबाबदाऱ्या व सध्याच्या तरुणींनी कुटूंब कसे एकत्रीत ठेवावे यावरती झणझणीत अंजन घालणारी स्वरचित हृदयस्पर्शी कविता सादर केली.

उपस्थित सर्व महिलांच्या
1) संगीतखुर्ची
2) लिंबू चमचा व
3) फुगा फोडणे या स्पर्धा घेण्यात आल्या व प्रत्येक स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्या माता भगिनींना आकर्षक बाक्षिस देण्यात आले.

स्पर्धेच्या विजेत्या खालीलप्रमाणे
1)संगीत खुर्ची स्पर्धा
प्रथम क्रमांक: सौ. प्रगती समाधान भोसले
द्वितीय क्रमांक सौ. भावना अमित सिरसट
तृतीय क्रमांक सौ. ऐश्वर्या संदिप दुधाळे
2)लिंबू चमचा स्पर्धा
प्रथम क्रमांक सौ. रुपाली भाऊ नागाळे
द्वितीय क्रमांक सौ. सारिका लंकेश्वर पाटील
तृतीय क्रमांक सौ. नंदिनी समाधान सिरसट
3)फुगा फोडणे स्पर्धा
प्रथम क्रमांक दिपाली समाधान धर्मे
द्वितीय क्रमांक प्रणिता अविराज सुर्वे-पाटील
तृतीय क्रमांक अश्विनी आबाराव कापसे
महिला मेळाव्याच्या शेवटी उपस्थित महिलांमधून लकी ड्रा द्वारे आकर्षक पैठणी साडीच्या मानकरी पल्लवी ज्ञानेश्वर शेळके या भगिनी लकी भाग्यवान पैठणी विजेत्या ठरल्या.
महिला मेळावा यशस्वी करयासाठी आमच्या शिक्षिका भगिनी श्रीदेवी मंताटी मॅडम, अनिता वाघमोडे मॅडम, अमृता नागणे मॅडम व मिनाक्षी शेटकार मॅडम यांनी परिश्रम घेतले.










