सोलापूर: छत्रपती शिवाजी महाराज सर्वोउपच्चार रुग्णालय सोलापूर येथील सिटीस्कॅन मशीन उपलब्ध नसून सोलापुरात रुग्णांची मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. असे दिसून आल्याने लवकरात लवकर सिटीस्कॅन मशीन उपलब्ध व्हावे म्हणून वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालय येथील अधिष्ठाता सदानंद भिसे यांनी आज सकाळी आमदार प्रणिती शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली..
यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असून लवकरच हे मशीन या महिन्यात उपलब्ध होईल असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.. याप्रसंगी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, विनोद भोसले, डॉ : अग्रजा चिटणीस, डॉ. ऋत्विक जयकर, आदी उपस्थित होते.