अधिकारी व कर्मचारी यांनी कामावर रूजु व्हावे,जनतेचे कामा साठी आंदोलन थांबवा – सिईओ मनिषा आव्हाळे

0
15

सोलापूर – जिल्हा परिषद येथील तोडफोडीच्या प्रकाराबद्दल जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभाग तसेच सर्व संवर्ग च्या वतीने ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पर्यंत उत्स्फूर्त पणे काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलन स्थगित करून कर्मचारी यांनी कामावर रूजु होणेचे आवाहन जिल्हा परिषेदेच्या सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले आहे. जिल्हा परिषदेत आज पत्रकारांनी सिईओ मनिषा आव्हाळे यांची भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला. या वेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

या बाबत पत्रकारांशी बोलताना सिईओ आव्हाळे म्हणाल्या, पोलीस प्रशासनाकडून कायद्यानुसार कार्यवाही सुरू आहे. सद्यस्थिती मध्ये दुष्काळजन्य परिस्थिती व अन्य प्रशासकीय कामकाजाची सद्यस्थिती पाहता काम बंद आंदोलन चालू ठेवणे उचित होणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांशी आपली बांधीलकी आणि उत्तरदायित्व लक्षात घेता मी आपणास आवाहन करते की , आपण काम बंद आंदोलन तात्काळ स्थगित करून आपल्या कार्यालयात उपस्थित राहून नियमित कर्तव्य सेवा बजावण्यात यावी तसेच काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व संवर्गाच्या आणि कर्मचारी संघटनांच्या अधिकारी कर्मचारी यांनी देखील तात्काळ नियमित कामकाजावर हजर राहणे करिता आपले स्तरावरूनआवाहन करण्यात यावे असे आवाहन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले आहेत.

काल कार्यालयाची तोडफोड होऊनही सिईओ मनिषा आव्हाळे यांनी विभाग प्रमुख व गटविकास अधिकारी यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले होते. राजपत्रित अधिकारी व कर्मचारी आंदोलन सुरू केलमुळे जनजिवन विस्कळीत होणेचे मार्गांवर असताना सिईओ मनिषा आव्हाळे यांनी आज स्वत: अधिकारी व कर्मचारी यांना मेसेज करून आंदोलन करू नका….लोकांचे कामांना प्राधान्य द्या असे आवाहन केले.उद्या बुधवार पासून कामावर रूजु व्हावे असे आवाहन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी केले. आज स्वत सिईओ मनिषा आव्हाळे दिवस भर कार्यालयात बसून येणारे अभ्यागत यांना भेटत होत्या.