सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयाच्या कबाड से जुगाड उपक्रमास उदंड प्रतिसाद

0
14

सेवासदन कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यावरण विभागाद्वारे आयोजित ” कबाड से जुगाड” या टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्मिती, प्रदर्शन व विक्री उपक्रमास सोलापूरकरांनी उदंड प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पर्यावरणदूत मा. प्रवीण तळे, स्पर्धेचे परीक्षक प्रा. प्रमोद मेणसे, संगीता रेळेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी, पर्यवेक्षक प्रा. पद्मकुमार उपाध्ये, प्रा. मधुरा गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थिनींनी पर्यावरण संवर्धनासाठी विविध टाकाऊ वस्तूपासून स्वतःच्या कौशल्याचा वापर करत अतिशय सुंदर आणि टिकाऊ वस्तू बनवल्या. या वस्तूचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमात सोलापूर शहरातील विविध महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थिनी, विविध शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, जिल्ह्यातील विविध पर्यावरणीय संवर्धक संस्थेतील मान्यवर, पर्यावरणदूत अशा जवळपास २००० व्यक्तींनी प्रदर्शनास सदिच्छा भेट दिली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना सेवासदन कनिष्ठ महाविद्यालय व सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ यांच्यावतीने रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, कार्यकारणी सदस्य डॉ. श्रीकांत येळेगावकर, सचिवा वीणा पतकी, मध्यवर्ती गणेश मंडळाच्या अध्यक्षा मा. लताताई फुटाणे, मा.हेमा चिंचोळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश कुलकर्णी, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रवीण तळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यावरण प्रमुख डॉ. तेजस्विनी मस्के, प्रा. सुप्रिया केसकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनींची नावे खालील प्रमाणे

प्रथम क्रमांक
साक्षी सौदागर

द्वितीय क्रमांक
भाग्यवंती बिराजदार

तृतीय क्रमांक
वैष्णवी राठोड

उत्तेजनार्थ पारितोषिके
१. तृप्ती चोपडे
२. किरण पाटील
३. ज्ञानेश्वरी जाधव
४. कु. कोमल कुर्ले