आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य, नितीन गडकरींची घोषणा

0
41

येस न्युज मराठी नेटवर्क : चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. एअरबॅग अनिवार्य करण्याला मंजुरी मिळाल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये गडकरी म्हणाले की, ‘आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या चारचाकी वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. हा मसुदा GSR अधिसूचना मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने याआधीच एक जुलै 2019 पासून चालक एअरबॅग आणि 01 जानेवारी 2022 पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती.’