• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गरज हीच संशोधनाची जननी: डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन

Yes News Marathi by Yes News Marathi
December 29, 2025
in इतर घडामोडी
0
गरज हीच संशोधनाची जननी: डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर विद्यापीठ अविष्कार संशोधन महोत्सवाचे शिवदारे कॉलेजमध्ये उद्घाटन..

सोलापूर – भावी संशोधक विद्यार्थ्यांनो, ‘गरज ही संशोधनाची जननी’ आहे. केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवातून शिका. एखादी गोष्ट ‘का’ आणि ‘कशी’ घडते, यावर विचार केल्यास तुम्हाला नवी दृष्टी मिळेल. आपली कल्पनाशक्ती वाढवा आणि चेतना जागृत करा; तुम्ही संशोधनात नक्कीच प्रगती करू शकाल, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी केले.

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे व्ही जी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स येथे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि संशोधनाला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या विद्यापीठ स्तरीय ‘अविष्कार’ महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, संचालक डॉ. व्ही. बी. पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य देवानंद चिलवंत आदी मान्यवर उपस्थित होते. व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, विश्वस्त भीमाशंकर शेटे व नरेंद्र गंभीरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सुत्रावे यांनी प्रास्ताविक केले, तर अविष्कार महोत्सवाचे सह समन्वयक डॉ. अशोक शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. समन्वयक डॉ. विनायक धुळप यांनी ‘अविष्कार’ महोत्सवाचा उद्देश व माहिती विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभदा उपासे व प्रियांका धुत्तरगी यांनी केले, तर डॉ. ए. बी. वळसंगे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला युनिक स्कूलच्या बँड पथकाने पाहुण्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी, युनिक स्कूलच्या किरण जोजारे व सहकाऱ्यांनी सुगम संगीताचा बहारदार कार्यक्रम सादर केला. महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर योगीनाथ बिराजदार यांनी गायलेल्या ‘वंदे मातरम्’ने सांगता झाली.

संशोधकांनी समाजाभिमुख विचार करावा

“विद्यार्थ्यांनी संशोधन करताना त्याचा समाजाला काय उपयोग होईल, याचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. कोणत्याही शाखेच्या विद्यार्थ्याने कोणत्याही विषयावर संशोधन करावे, ही काळाची गरज आहे.”
— प्रा. डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू

३९१ पैकी २४६ विद्यार्थिनींचा सहभाग
या स्पर्धेत सहा विभागांतून शहर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील एकूण ३९१ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. विशेष म्हणजे, यात २४६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. या महोत्सवात पदवी, पदव्युत्तर व संशोधक विद्यार्थ्यांनी २७३ पोस्टर्स आणि ३६ मॉडेल्स सादर केली आहेत. यातून परीक्षक मंडळ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ४८ विद्यार्थ्यांची निवड करणार आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ४८ विद्यार्थ्यांची होणार निवड
डॉ. सागर कोंडेकर, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. निलेश तरवळ, डॉ. ज्ञानेश्वर देशमुख, डॉ. कृष्णा अळसुनकर, डॉ. विकास सरनाईक, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. गोपाळ पांचाळ, डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. विक्रम खिलारे, डॉ. प्रशांत अग्निहोत्री आणि डॉ. संदीप पाटील हे परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. निवडलेले विद्यार्थी परभणी येथे १२ ते १५ जानेवारी दरम्यान होणाऱ्या राज्यस्तरीय ‘अविष्कार’ स्पर्धेत सोलापूर विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.

Previous Post

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर निवडणूक आयुक्तांचा डोळा…

Next Post

कुणाच्या खांद्यावर कुणाचा झेंडा.. भाजप उद्या देणार एबी फॉर्म.. ३१६ अर्ज दाखल

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
कुणाच्या खांद्यावर कुणाचा झेंडा.. भाजप उद्या देणार एबी फॉर्म.. ३१६ अर्ज दाखल

कुणाच्या खांद्यावर कुणाचा झेंडा.. भाजप उद्या देणार एबी फॉर्म.. ३१६ अर्ज दाखल

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026