मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी पोहोचले आहेत. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठीचे समन्स देण्यासाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडे यांच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला हे समन्स दिले आहेत. असे बोलले जाते आहे की, ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आर्यन खानच्या ड्रग्स चॅटमध्ये बोलले जात होते, ती अनन्या पांडे होती. मात्र, अद्याप याची पुष्टी झालेली नाही. सध्या एनसीबीने अनन्या पांडेला दुपारी 2 वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे.
रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडे सोबत, ड्रग्स चॅटमध्ये आर्यन खानची बहीण सुहाना खानचे नावही समोर आले आहे. अनन्या पांडेच्या घरून बाहेर आल्यानंतर एनसीबीची एक टीम शाहरुख खानच्या मन्नतच्या घरी पोहोचली, जिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे.










