महापालिकेच्या वतीने सुरू झाले मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर अभियान

0
27

सोलापूर –केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने (MoHUA) “मेरी लाइफ मेरा स्वच्छ शहर” हे अभियान दिनांक १५.०५.२०२३ पासून पुढील ३ आठवड्यांच्या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतला असून या अभियानांतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांना “रिड्यूस, रियुज आणि रिसायकल” सेंटर्स म्हणजेच RRR केंद्रे स्थापन करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सदर अभियानाच्या अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना, निर्देश व करावयाची कार्यवाही यांचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.RRR सेंटर चे उद्देश: सोलापूर शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लॅस्टिक, कपड़े, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू गोळा करून त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी “रिड्यूस, रियुज आणि रिसायकल” सेंटर्स म्हणजेच RRR केंद्रे स्थापन करणे आणि या संकलित केलेल्या वस्तू नूतनीकरण, पुनर्वापर किंवा नवीन उत्पादने तयार करण्यासाठी विविध भागधारकांना सुपूर्द करणे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे.सदर उपक्रम राबविणे करिता शहरामधील खालील नमूद ठिकाण निश्चित करण्यात आलेले आहे.

1)महात्मा फुले सुपर मार्केट,आहरकर बजाज शोरूम शेजारी 2)रविवार पेठ तेलगु म .न.पा. शाळा क्र.1,कुचन हायस्कूल जवळ 3)पद्मा नगर, कर्णिक नगर लगत असलेले बास्केट बॉल मैदान जवळ. 4)नीलम नगर,गणपती मंदिर जवळ,5)जुळे सोलापूरातील डी-मार्ट,HSR पाणी टाकी शेजारी 6)दमाणी नगर,सुंदराबाई डागा मनपा शाळा.7)सिव्हील चौक,सिव्हील हॉस्पिटल समोरील आरोग्य निरीक्षक यांचे ऑफिस 8) मार्कडेय उद्यान,MSEB ऑफिस शेजारी. RRR सेंटरचा कालावधी दिनांक 20/05/2023 ते दि.05/06/2023

RRR सेंटरची वेळ –सकाळी 7:00 ते दुपारी 1:00 राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी मुख्य सफाई अधीक्षक सो.म.प मो.9422647155 यांच्याशी संपर्क साधावा.

अतिरिक्त असेल ते देऊन जा आणि उपयोगी असेल ते घेऊन जा. — महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले

सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने केंद्रशासन व राज्य शासनाचे मार्गदर्शनानुसार “मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर” या अभियानात सहभाग घेतला आहे. या अभियानाचा भाग म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व 8 झोन मध्ये प्रत्येकी एक असे आठ RRR (Reduce Reuse Recycle) असे केंद्र स्थापन केलेली आहेत.

दैनंदिन जीवनात आपण नवीन कपडे, घरातील इतर साहित्य खरेदी करत असतो यात आपल्या घरातील गरज संपलेल्या परंतु चांगल्या अवस्थेत असलेल्या आणि उपयोगी पडू शकतील अशा अनेक वस्तू घरात साठल्या जातात आणि नंतर त्या वस्तु भंगारात किंवा कचऱ्यात टाकून दिल्या जातात. आपल्या दृष्टीने जरी त्या वस्तू जुन्या आणि टाकाऊ असल्या तरी समाजातील काही घटकांना त्या वस्तूची आवश्यकता असते. आपल्यासाठी निरपयोगी असलेली वस्तू कोणाची तरी गरज भागवू शकते. त्यामुळे या जुन्या वस्तू सोलापूर महानगरपालिकेच्या आठही RRR केंद्रावर दिनांक 20 में 2023 ते 5 जून 2023 अखेरपर्यंत सकाळी 7 ते दुपारी 1 या कालावधीत जमा करता येतील आणि जमा झालेल्या वस्तू गरजना उपलब्ध करून दिल्या जातील.शहरातील नागरिकांनी तसेच स्वयंसेवी संस्थांनी या समाजकार्यात सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले.