आजपासून ३० ऑगस्ट पर्यंत देशभर विविध कार्यक्रमांसह अभियानाचा प्रारंभ
सोनामाता आदर्श विद्यालयांमध्ये “मेरी माटी मेरा देश“ अभियानाच्या सेल्फी बुथाचे विद्यार्थ्यीनीच्या हस्ते शुभारंभ! शासकीय अधिकारी, विद्यार्थ्यी, शिक्षक आणि पालकांनी घेतली पंचप्रणची शपथ.
सोलापूर : दि. ९ – “मेरी माटी मेरा देश” अभियान म्हणजे स्वातंत्र्यसाठी थोर वीरांनी दिलेले बलिदान, देशाच्या अखंड व एकात्मतेसाठी सर्वस्व अर्पण केलेल्या वीरांचे स्मरण आहे. मातीला वंदन आणि वीरांना नमन हे या अभियानाची संकल्पना आहे,असे प्रतिपादन क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी आज येथे केले.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने आज रेल्वे लाईन येथील सोनामाता आदर्श विद्यालयामध्ये “मेरी माटी मेरा देश” अभियानाच्या सेल्फी बुथचे उद्घाटन आणि पंचप्रण शपथ प्रसंगी चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात पंचप्रण च्या शपथने करण्यात आमातृभूमीची स्वतंत्रता आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरिता बलिदान दिलेल्या वीराना वंदन म्हणजे “मेरी माटी मेरा देश” अंकुश चव्हाण यांचे प्रतिपादनली.
यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक न. भ. अघोर, शिक्षण पर्यवेक्षक जि.ह. पटेल, निवृत्त अधिकारी सतीश घोडके, क्षेत्रीय प्रचार सहायक अंबादास यादव, सुजाता सुतार, स. स जाधव, भि.भ. माने, गौ.रा. खांडेकर आणि सौ दि.अ. घोगले आदी मान्यवर उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० जुलैच्या मन की बात मध्ये “मेरी माटी मेरा देश“अभियानाची घोषणा केली होती. या अभियानाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकामध्ये आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि स्वातंत्र्य संग्रामविषयी अभिमान निर्माण करण्याचा उद्देश आहे. भारताला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याची जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.
मेरी माटी मेरा देश अभियानामध्ये प्रत्येक गाव व ग्राम पंचायतमधील अमृत सरोवर, शाळा, मुख्य ठिकाणी अथवा ग्राम पंचायत कार्यालयामध्ये शिलाफलकम उभारणी करण्यात येणार आहे यामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे प्रतिक चिन्ह, पंतप्रधान याचे विजन २०४७ संदेश, स्थानिक गावातील हुतात्मा झालेल्या वीरांचे नावे आणि ग्रामपंचायतचे नाव असणार आहे. वसुधा वंदनाद्वारे देशी झाडांची माहिती आणि पर्यावरणाविषयी जनजागृती होणार आहे. गावातील जवानाचा आणि हुतात्मा झालेल्या वीरांच्या कुटुंबातील सदस्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पंचप्रण शपथ द्वारे भारताला २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र निर्माण करण्याचा, गुलामगिरी मानसिकतेतून मुक्तता, समृद्ध वारशाचा गौरव, एकात्मता आणि शूर वीरांना प्रति सन्मान आणि नागरिकांच्या कर्तव्याचे पालन संबधीसह ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत आदी पाच उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्री यादव यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारत छोडो आंदोलन आणि मेरी माटी मेरा देश अभियानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन विजेतांचा सन्मान करण्यात आला. अभियानाचा लोकजागर व्हावं या उद्देशाने विद्यालयात सेल्फी बुथ ठेवण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनी सेल्फी द्वारे या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मो. ज्ञ. कांबळे यांनी केले आणि सुजाता सुतार यांनी आभार मानले.
कार्याक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यालय सहायक जे एम हन्नुरे, अ.प्र. अत्रे, व्य. ग. धुगे, अ.जा. डोईफोडे, रा.म. विंचूरकर, सं.कि. भोसले, स. पू. कांपाद, म.ज्ञा. पवार, स्मिता वाले, उमेश नाळे आणि श्री जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक उपस्थित होते.