सोलापूर शहरात महापालिकेच्या वतीने माझी माती माझा देश अभियान सुरू

0
38


सोलापूर – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानाला आजपासून (9 ऑगस्ट, 2023) सुरुवात झाली असून आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सर्व खाते व विभागीय कार्यलायात सर्व अधिकाऱ्यांनी पंच प्रणची शपथ घेतली. तसेच तुळजापूर वेस, बलिदान चौक येथील हुतात्मा स्तंभाजवळ महापालिकेचे अधिकाऱ्यांसह शाळेतील विद्यार्थ्यांनी पंच प्रणची शपथ घेतली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने ‘मेरी माटी मेरा देश’अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियाना अंतर्गत दिनांक 9 ते 14 ऑगस्ट 2023 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये वसुधा वंदन,स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन तसेच पंचप्रण शपथ घेणे त्याचबरोबर ध्वजारोहण, अमृत वाटिका इत्यादी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.या मध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकसहभाग अशा सर्वांचा सहभाग राहणार आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शिलापलकम उभारण्याचे काम हे महानगरपालिकेच्या कॅम्प शाळेत करण्यात येत आहे. या शिलाफलकमाचे अनावरण 14 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात येणार आहे. या शिलाफलकमवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो, मा. प्रधानमंत्री यांचा व्हिजन 2047 संदेश,शिलाफलकमाचे अनावरण झाल्यानंतर ध्वजा रोहन होईल त्यानंतर पंच प्रण शपथ घेतली जाणार आहे. जयभवानी सोसायटी, आर्किटेक्चर कॉलेज येथील सोलापूर महानगरपालिकेच्या विरंगुळा केंद्र येथे अमृत वाटीका तयार करण्यात येणार असून त्या ठिकाणी 75 देशी प्रजातीचे वृक्ष लावण्यात येणार आहेत.14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे माजी सैनिक तसेच स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांच्या कुटुंबांचा सत्कार, संरक्षण, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य पोलीस दलातील सेवानिवृत्त व्यक्तींचा सत्कार या उपक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे.याशिवाय, मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा उपक्रम राबविला जाणार आहे. तरी सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी या कालावधीत आपल्या घरांवर या दिवशी तिरंगा फडकावण्यात यावा असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

मा. आयुक्त यांचे आवाहन
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 9 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट 2023 मेरी माटी मेरा देश’अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियान राबविण्यात येत असून या अभियानामध्ये स्वातंत्र्य सैनिक, हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबिय,लोकप्रतिनिधी,माजी नगरसेवक, सामाजिक संघटना, संस्था तसेच सोलापूर शहरातील नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले.