दूरदर्शन आणि चित्रपटातील अभिनेत्री मौनी रॉय तिच्या फोटोशूटमुळे मात्र नेहमीच चर्चेत असते. रॉयने अलीकडेच केलेल्या फोटोसेशनमुळे ती पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
ओपन शर्ट घालत तिने जमिनीवर केलेले फोटो शूट लक्षवेधक ठरले आहे. थोडा तरी प्रकाश आतमध्ये जाण्यासाठी आपण सारेच जण गंभीर असतो, असे तिने फोटोला कॅप्शन दिले आहे. अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. लवकरच ती आलिया भट आणि रणवीर कपूरबरोबर चित्रपटात दिसणार आहे.