• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उमाबाई श्राविका विद्यालयात मराठी भाषेचा जागर; विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणाने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.

Yes News Marathi by Yes News Marathi
February 27, 2026
in इतर घडामोडी
0
उमाबाई श्राविका विद्यालयात मराठी भाषेचा जागर; विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणाने मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा.
0
SHARES
1
VIEWS

दिनांक 27 फेब्रुवारी 2020 वार शुक्रवार सोलापूर येथील उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कविवर्य वि.वा. शिरवाडकर यांची जयंती अर्थातच मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित तर प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांची उपस्थिती होती.

प्रारंभी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर साहित्यिक वि.वा. शिरवाडकर व थोर शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रशालेतील संगीत शिक्षिका सोनाली उंडे व पल्लवी खांडवे यांनी स्वागत गीताद्वारे प्रमुख अतिथींचे शब्द सुमनांनी स्वागत केले. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला. प्रशालेचे पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांनी आपल्या प्रास्ताविकेतून मातृभाषा मराठीचे महत्त्व विशद केले व भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्याच्या दुःखाला वाचा फोडणाऱ्या बळीराजाच्या जीवनावर आधारित आधारित कवितेचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सुकुमार मोहोळे यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व मराठी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षिका सोनाली उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषेचे जतन व संवर्धन या विषयावर तयार केलेल्या सुंदर हस्तलिखिताचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सहशिक्षिका पल्लवी खांडवे व इयत्ता आठवीतील विद्यार्थिनींनी शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण या पोवाड्याचे सादरीकरण करून उपस्थित विद्यार्थ्यांच्या मनामनात मराठी भाषेचा अभिमान जागवला. मराठी भाषेचा उगम, अभिजात भाषेचा दर्जा, विविध साहित्याची माहिती आपल्या भाषणातून प्रशालीतील विद्यार्थिनी संस्कृती साळुंखे, नव्या गणेश व अनुष्का वाघमोडे यांनी करून दिली. मराठी दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून यावर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. आदर्श वाचन कसे करावे याचे प्रात्यक्षिक सादर करून त्याबद्दल विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षिका प्रियंका जैन यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गोमू माहेरला जाते हो नाखवा, अति तिथ माती, शिवकालीन मराठी भाषेचा अभिमान जागवणारे नाटक, विनोदी नाटक अशा बहुरंगी, बहुढंगी कार्यक्रमाचे सादरीकरण केले. प्रशालेतील सहशिक्षक अनुप कस्तुरे यांनी मराठी साहित्यिकांची माहिती देणाऱ्या भित्तिपत्रकांच प्रदर्शन यावेळी भरवले होते जणू काही साहित्य संमेलनाची मांदियाळीच वाटत होती. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक सुकुमार वारे यांनी केले. आपल्या सूत्रसंचालनाच्या माध्यमातून त्यांनी विविध साहित्यिकांच्या कविता व पोवाडे यांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. प्रशालेतील कलाशिक्षक यांनी मराठी दिनानिमित्त रेखाटलेले चित्र सर्वांचे आकर्षण ठरले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख माधवी खोत, प्रीती वऱ्हाडे, सोनल आळंद, सुकुमार वारे, अनुप कस्तुरे, सुहास छंचुरे, अभिनंदन उपाध्ये, अभिजीत पाटील, वैभव बारडकर, सोनाली उंडे,पल्लवी खांडवे, प्रियंका जैन तसेच बसवेश्वर कुंभार, हरी ऐवळे, सुनंदा भालेराव कांबळे मावशी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

सोलापूरचा मुलगा थेट दक्षिण कोरियात डॉक्टरेट

Next Post

दोन्ही देशमुखांना ऐवजी पालकमंत्री ठरवणार तोच होणार स्थायीचा सभापती…!

Related Posts

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
Next Post
दोन्ही देशमुखांना ऐवजी पालकमंत्री ठरवणार तोच होणार स्थायीचा सभापती…!

दोन्ही देशमुखांना ऐवजी पालकमंत्री ठरवणार तोच होणार स्थायीचा सभापती…!

ताज्या बातम्या

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026