मनिषा आव्हाळे यांनी घेतला सोलापूर जिल्हा परिषेदेच्या सीईओ पदाचा पदभार

0
35

सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषेदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार नुतन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी घेतला. जिल्हा परिषदेत आज सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी मनिषा आव्हाळे यांनी कार्यालयात येऊन सिईओ पदाचा पदभार घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सिईओ पदाचा पदभार मनिषा आव्हाळे यांना सुपूर्द केला.

या प्रसंगी सिईओ दिलीप स्वामी यांनी नुतन सिईओ मनिषा आव्हाळे यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. या प्रंसगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, अधिक्षक अनिल जगताप, अधिक्षक ए झेड शेख, कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिवानंद मगे, मल्लिकार्जून तलवार यांचे सह ग्रामपंचायत व सामान्य प्रशासन विभागाचे कर्मचारी यांनी स्वागत केले. या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी विविध राबविलेल्या नाविण्यपुर्ण उपक्रमाची माहिती नुतन सिईओ मनिषा आव्हाळे यांना दिली.

नाविण्यपुर्ण उपक्रमाचे सातत्य राखू – मनिषा आव्हाळे
सिईओ दिलीप स्वामी यांनी राबविलेले विविध नाविण्यपुर्ण उपक्रमाचे सातत्य राखू अशी प्रतिक्रिया नुतन सिईओ मनिषा आव्हाळे यांनी दिली.