शिराळा तालुक्यातील संभाव्य धोकादायक भूस्खलन भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पहाणी

0
29

सांगली (सुधीर गोखले) – शिराळा तालुक्यातील मणदूर मधील मिरूखेवाडी आरळापैकी कोकणेवाडी या अतिवृष्टी आणि संभाव्य धोकादायक भूस्खलन भागाची पाहणी आज जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली यावेळी येथील ग्रामस्थांना सांगली जिल्ह्यात दाखल एन डी आर एफ च्या जवानांकडून अत्यावश्यक काळी वापरण्याचा सॅटेलाईट फोन आणि इतर बाबींचे प्रात्यक्षिक दाखवली गेली.


यावेळी आपत्कालीन काळात संभाव्य भूस्खलन धोका टाळण्यासाठी या परिसरातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर या विषयी गावामध्ये जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांनी बैठक घेऊन उपाययोजनांवर चर्चा केली तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळता यावी यासाठी तातडीने दोन सॅटेलाईट फोनही या गावांमध्ये देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी दयानिधी यांनी सांगितले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्थानिक पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून तात्पुरते निवारा केंद्र उभारण्याविषयी निर्णय आपण घेऊ हा भाग शासनाच्या नोंदीप्रमाणे धोकादायक ठरला असून दुसऱ्या ठिकाणी येथील ग्रामस्थांचे कायमचे पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी करताना जागा मालकांना योग्य मोबदला देऊन कशा प्रकारे नियोजन करता येते हे आपण पाहू असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले
यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक सत्यजित देशमुख यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री नाईक म्हणाले कि आता तातडीने या ग्रामस्थांचे दुसरीकडे पुनर्वसन शक्य नाही आता तात्पुरत्या स्वरूपात या नागरिकांचे स्थलांतर करणे उचित ठरेल. सत्यजित देशमुख म्हणाले, येथील परिसरातील भागामध्ये वन्य प्राण्याचा मोठा धोका आहे आणि येथील काही गावांनी स्तलांतरित न होण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे या नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करावे.


यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक वन संरक्षक अधिकारी नीता घट्टे अजित सासणे, पुनर्वसन अधिकारी रघूनाथ पोटे, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन तहसीलदार शामल खोत पाटील गटविकास अधिकारी संतोष राऊत विराज नाईक हणमंत पाटील आदी उपस्थित होते.