• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सॅनिटरी नॅपकिन्स वापरूया…स्वच्छतेचा जागर करूया !

Yes News Marathi by Yes News Marathi
February 20, 2021
in मुख्य बातमी
0
सॅनिटरी नॅपकिन्स वापरूया…स्वच्छतेचा जागर करूया !
0
SHARES
1
VIEWS

‘प्रिसिजन’च्या सीएसआर निधीतून शाळांना ‘सॅनिटरी नॅपकिन्सचे व्हेंडिंग व डिस्पोजल मशीन्स’

सोलापूर : प्रिसिजन उद्योगसमूहाच्या सीएसआर निधीतून शिक्षिका व विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग मशीन व इन्सिनरेटर (डिस्पोजल मशीन) बसविण्यात आले आहेत. सोलापूर विद्यापीठ तसेच दहा शाळांमधील १७८० पेक्षाही अधिक विद्यार्थिनींना याचा लाभ मिळणार आहे.

प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दि. २० फेब्रुवारी रोजी या मशीन्सचे लोकार्पण झाले. लिमयेवाडी येथील सोनामाता विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमास डॉ. उमा प्रधान, डॉ. नभा काकडे हे मान्यवर उपस्थित होते. मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन्स वापरून स्वच्छतेचा जागर करण्याचा निर्धार या वेळी उपस्थित शिक्षिकांनी व्यक्त केला.

प्रिसिजन फाउंडेशनने फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने ‘सर्वंकष लैंगिक शिक्षण’ उपक्रमाच्या माध्यमातून २०१८ सालापासून पाच हजारांपेक्षाही अधिक शालेय विद्यार्थिनींचे मासिक पाळीबद्दल प्रबोधन केले होते. याचाच पुढचा टप्पा म्हणून सोलापूर शहर परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलींच्या शाळेत त्यांच्या दैनंदिन वापरासाठी हे सॅनिटरी नॅपकिन्सचे मशीन्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे डॉ. सुहासिनी शहा यांनी सांगितले.

लाभार्थी संस्थांमध्ये सोलापूर विद्यापीठ, लालबहादूर शास्त्री विद्यालय (सत्तरफूट रोड), मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह (एम्प्लॉयमेंट चौक), सोनामाता विद्यालय (लिमयेवाडी), न. फू. शहा-कोठारी विद्यालय (कुमठा नाका), वसंतराव नाईक प्रशाला (सदर बझार), श्री समर्थ विद्यामंदिर (शास्त्री नगर), श्री साईबाबा प्रशाला (जुने विडी घरकूल), श्री शंकरलिंग महाविद्यालय (वळसंग), समाधान प्रशाला (दहिटणे), सावित्री कन्या प्रशाला (रानमसले) यांचा समावेश आहे.

यावेळी प्रिसिजन उद्योगसमूहाच्या जनसंपर्क विभागाचे माधव देशपांडे, आदित्य गाडगीळ, स्नेहा सपकाळ, सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्य अश्विनी चव्हाण, सोनामाता विद्यालयाच्या सुवर्णा अत्रे, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे विरेंद्रसिंह परदेशी, मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहाच्या अधीक्षक सुहासिनी कुलकर्णी यांच्यासह सोलापूर विद्यापीठ तसेच लाभार्थी शाळांमधील शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.

सॅनिटरी नॅपकिन्स मशीनची वैशिष्ट्ये
प्रिसिजन उद्योगसमूहाने सोलापूर विद्यापीठात सहा तर दहा शाळांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सोळा संच बसविले आहेत. प्रत्येक संचात एक व्हेंडिंग मशीन व एक डिस्पोजल मशीनचा समावेश आहे. व्हेंडिंग मशीनला इलेक्ट्रिक सप्लायची गरज नसून त्यामध्ये पाच रूपयांचे कॉईन टाकून सॅनिटरी नॅपकिन घेता येतो. व्हेंडिंग मशीनमध्ये एकावेळी पन्नास सॅनिटरी नॅपकिन्सची क्षमता आहे. नॅपकिन्सचे रिफिलिंग वगळता या मशीनला कोणताही मेंटेनन्स नाही. इन्सिनरेटर अर्थात डिस्पोजल मशीनला इलेक्ट्रिक सप्लायची आवश्यकता असून त्यामध्ये एकावेळी जास्तीतजास्त तीन नॅपकिन्स जाळले जाऊ शकतात. याप्रमाणे दिवसभरात जास्तीत जास्त पंचवीस वेळा ही मशीन बर्निंगसाठी वापरली जाऊ शकते. दैनंदिन वापराच्या दृष्टीकोनातून या दोन्ही मशीन्स अत्यंत यूजर फ्रेंडली व अत्यल्प मेंटेनन्स असणार्‍या आहेत.

Previous Post

किणी भीमनगर वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

Next Post

ठाकरे यांनी उड्डाणासाठी राजभवनचा वापर थांबविला

Related Posts

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
Next Post
ठाकरे यांनी उड्डाणासाठी राजभवनचा वापर थांबविला

ठाकरे यांनी उड्डाणासाठी राजभवनचा वापर थांबविला

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026